मुंबई 18 मे: गेले काही दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या ‘रानबाजार’ या सीरिजच्या टीजर्सनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्ड सीन्समुळे खळबळ उडाली आणि आता याच वेबसीरिजचा ऑफिशिअल ट्रेलर (RaanBaazaar Official Trailer) लाँच झाला आहे. ‘ठाकरे’ आणि ‘रेगे’ या गाजलेल्या सिनेमांनंतर अभिजित पानसे यांचं दिग्दर्शन असलेली ही वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. रानबाजार ही खूपच बोल्ड आणि डार्क विषयाला हात घालणारी आहे हे ट्रेलरवरून जाणवतं. या सिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असणाऱ्या दोन अभिनेत्रींचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज बघायला मिळतोय. अर्थात अंगप्रदर्शन किंवा त्या उद्देशाने हा बोल्डनेस नसून ती कथेची गरज असल्याचं ट्रेलरवरून जाणवतो. टीजरवरून फक्त तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीच्या बोल्डनेसची चर्चा झाली होती. ट्रेलर आल्यावर त्यात राजकीय नाट्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या टोकाच्या राजकारणाची ही गोष्ट दिसते. डिजिटल विश्वातल्या मराठी कण्टेण्टच्या कक्षा उंचावून बोल्ड विषयाला हात घालणारी ही बहुधा पहिली वेबसिरीज आहे असं म्हणलं जातंय. ‘राजकीय बोल्डबाजार’ असं त्याचं वर्णन होत आहे. दोन टीजर प्रदर्शित झाल्यानंतर आज रानबाजार चा सिझलिंग ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिरीजमध्ये दिसणाऱ्या वेश्या व्यवसायाशी निगडित गूढ या ट्रेलरमुले आणखीन गहिरं होत आहे. रहस्यमय ट्रेलरनंतर सिरीज बघण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. **हे ही वाचा-** अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय सुरवातीपासूनच या वेबसिरीजबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. वेश्या व्यवसायावर आधारित या कथानकात राजकीय वळण सुद्धा आहे अशी शंका वर्तवली जात आहे. टीजरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो तर त्यासोबत तेजस्विनी आणि प्राजक्ताचा कधीही न पाहिलेलं हॉट रूप यात बघायला मिळतं.
या वेबसिरीजचे दोन टीजर पोस्ट झाल्यावर प्रेक्षकांनी मात्र तेजस्विनी आणि प्राजक्ताची चांगलीच खबर घेतली आहे. दोघींचाही पूर्णतः वेगळा अंदाज यात दिसत असल्याने काहींना तो पचनी पडला नसल्याचं दिसतंय. मात्र दुसरीकडे खूप लोकांनी तेजस्विनी आणि प्राजक्ताच्या या भूमिकांचं स्वागत केलं असून एवढा बोल्ड अंदाज स्वीकारण्याचं धाडस केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. एवढी उत्सुकता ताणून ठेवल्यानंतर ही वेबसिरीज काय कमाल करते हे बघणं महत्त्वाचं राहील. प्लॅनेट मराठी ओरिजनल्स असलेली ही सिरीज प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 20 मे पासून स्ट्रीम होणार आहे.