उर्फी जावेद
मुंबई, 04 जानेवारी: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं. एवढंच नाही तर उर्फी विरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिलं. दरम्यान आता चित्रा वाघ यांचं उर्फीबद्दल केलेलं एक ट्विट पुन्हा व्हायरल होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ नेहमीच महिलांच्या प्रश्नांवर आपली मतं मांडत आली आहेत. मुंबईत महिलांवर होणारे अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणिती असोत त्या नेहमी आपली परखड मत मांडत असतात. एकीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे सोशल मीडियावर बिनधास्त कपड्यांचा बाजार मांडणाऱ्या उर्फीवर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा - Urfi javed on Chitra Wagh : ‘आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss’; उर्फी जावेद पुन्हा वाघांच्या वाटेला अलीकडेच केलेल्या एका ट्विटमध्ये चित्रा वाघ महिला आयोगाला संबोधत म्हणतायत कि, ‘भाषा नको तर कृती हवी… सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?… मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ?…. भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये… महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ?…. विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे…. आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही … #सामाजिकभान #स्वैराचारालाविरोध’'
आता चित्रा वाघ यांच्या या ट्विट नंतर उर्फी त्याला काय उत्तर देणार आणि तिच्यावर कारवाई होणार का ते पाहणं महत्वाचं आहे. तर काल पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या होत्या कि, “उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसात तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी.”असा आक्रमक इशारादेखील चित्रा वाघ यांनी दिला होता.
यानंतर आता चित्रा वाघ यांनी महिला आयोगाकडे पुन्हा तक्रार केली आहे. आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.