उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे कायमच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. 

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. 

चित्रा वाघ यांनी उर्फीला बेड्या ठोका अशी मागणी केली. यावर उर्फीदेखील शांत बसली नाही तिनंही प्रतिउत्तर दिलं. 

आता उर्फीनं आणखी एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नवीन वर्षाचं औचित्य साधत उर्फी म्हणाली, 'माझ्या नवीन वर्षाची सुरुवात एका राजकीय नेत्याच्या पोलीस तक्रारीने झाली! 

राजकारण्यांकडे काही काम नाहीत का? मला तुरुंगात पाठवता येईल, असे राज्यघटनेत एकही कलम नाही.

अश्लीलता, नग्नतेची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही.

मुंबईमध्ये मानव तस्करी, बेकायदेशीर डान्सबार, वेश्याव्यवसाय बंद कसे करायचे? याचा सुद्धा विचार करा.

उर्फी एवढीच पोस्ट करुन थांबली नाही तिने पुढे लिहिलं, 'मी आता तुरुंगात जायला तयार आहे. फक्त तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीबाबत सांगा. 

त्यामुळे आता चित्रा वाघ काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.