JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss OTT 2: 'मी इथून जातोय...' जेडी आणि आकांक्षा मध्ये झालेल्या 'त्या' किसिंग वरून भडकला सलमान खान

Bigg Boss OTT 2: 'मी इथून जातोय...' जेडी आणि आकांक्षा मध्ये झालेल्या 'त्या' किसिंग वरून भडकला सलमान खान

शोमधील स्पर्धक जेडी हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये चक्क एकमेकांना किस केलं. आता आठवड्याच्या शेवटी सलमानने या दोघांना चांगलंच फैलावर घेतलं आहे.

जाहिरात

बिग बॉस ओटीटी 2

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जुलै :  बिग बॉस हा वादग्रस्त कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ‘ बिग बॉस ओटीटी 2 ’ हा शो नुकतंच जिओ सिनेमावर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या या शोला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. पण याविषयी एक विशेष गोष्ट म्हणजे हा शो सेन्सॉर्ड नाही. या शोमध्ये जे घडेल त्यावर काही मर्यादा नाहीत. पण नुकतंच या शो मध्ये स्पर्धकांनी मर्यादा सोडून असं काही केलं की पप्रेक्षकांनी शो विषयी संताप व्यक्त केला.  शोमधील स्पर्धक जेडी हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये चक्क एकमेकांना किस केलं. आता आठवड्याच्या शेवटी सलमानने या दोघांना चांगलंच फैलावर घेतलं  आहे. शो मध्ये कॅमेऱ्यासमोर असं काही घडलं की ते पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. जेडी हदीद आणि आकांक्षा पुरी यांनी ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये चक्क एकमेकांना किस केलं. हे घडल्यानंतर प्रेक्षक या शो विषयी संताप व्यक्त करत होते. काही जणांनी भाईजान वर देखील निशाणा साधला होता.  आता या शोचा होस्ट सलमान खानने वीकेंड का वार मध्ये या दोघांची चांगलीच शाळा घेतली आहे.

या आठ्वड्यात सलमान खान येताच त्याने किसींगचा मुद्दा उपस्थित केला, ज्याची सगळीकडे चर्चा आहे. आकांक्षा पुरी आणि जेडी हदीदच्या किसिंग प्रकरणावर  अभिनेत्याने सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आणि सांगितले की यापुढे असे काहीही दाखवले जाणार नाही आणि होऊ नये याची काळजी घेईन असं देखील सांगितलं. जिंकलस भावा! मराठमोळ्या अभिनेत्यानं गरजू शाळकरी मुलाला केली अशी मदत; पाहून भारावले चाहते बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार तो स्पर्धकांवर भलताच नाराज दिसत आहे. तो म्हणाला, ‘‘तुम्हा सर्वांना असे वाटते की हे आठवड्याचे मुख्य आकर्षण होते. पालनपोषण, कुटुंब, नैतिकता यावर आधारित हा शो आहे.’ जेडीला संबोधत तो म्हणाला की, ‘‘तू जे केलेस त्याबद्दल तुला माझी माफी मागायची गरज नाही. मला काही फरक नाही पडत. मी इथून बाहेर जात आहे मी हा शो सोडत आहे.’’ असं संतप्त होऊन सलमान स्टेजवरून निघून जातो. एवढ्यातच अब्दू रोजिकने शो मध्ये एंट्री घेतली. त्यांने बिग बॉसचा 16 वा सिझन गाजवला होता. आता तो बिग बॉस ओटीटी च्या मंचावर पुन्हा दिसला आहे. त्याने त्याच्या बिग बॉसच्या आठवणींना उजाळा दिला.

या एपिसोडमध्ये आकांक्षाने किसिंग प्रकरणावर मौन सोडलं आहे. या घटनेबद्दल बोलताना आकांक्षा म्हणाली, “एक भारतीय महिला कलाकार म्हणून मला काय विचित्र वाटते हे जेडीने समजून घ्यावे अशी माझी इच्छा होती. मला अपेक्षा होती की तो येऊन माझ्याशी बोलेल आणि संपूर्ण परिस्थितीबद्दल त्याचे स्पष्टीकरण देईल. संवाद महत्त्वाचा आहे आणि मला त्या आश्वासनाची गरज आहे.’ असं मत तिने व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या