मुंबई, 12 मार्च- ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Mrathi) चा तिसरा सीजन (Season 3) प्रचंड गाजला. या शोमध्ये अनेक कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते. शोमुळे या सर्व स्पर्धकांना एक नवी ओळखसुद्धा मिळाली आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. शोमध्ये अनेक राडे, मैत्री आणि प्रेम पाहायला मिळालं होतं. दरम्यान शोमध्ये विशाल आणि सोनालीची हटके केमिस्ट्री आणि त्यांनतर त्यांच्यात झालेला वादसुद्धा प्रचंड चर्चेत आला होता. या सर्व प्रकारानंतर सोनाली (Sonali Patil) आणि विशाल (Vishal Nikam) पुन्हा एकत्र कधी येणार याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता लागून होती. त्यांच्या चाहत्यांसाठी आजची बातमी सुखावणारी आहे यात शंका नाही. नुकतंच कलर्स मराठी पुरस्कार सोहळा पार पडला यामध्ये कलर्स वाहिनीवरील सर्व कलाकार उपस्थित होते. मग यामध्ये बिग बॉस मराठीचे स्पर्धक कसे मागे राहतील? या पुरस्कार सोहळ्यासाठी बिग बॉस मराठीचे स्पर्धक पुन्हा एकत्र आले होते. यावेळी बी टीमचं रियुनिअन पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी विशाल आणि सोनालीला पुन्हा एकत्र पाहून सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यांचे चाहते त्यांना एकत्र पाहून प्रचंड खुश आहेत. त्यांचा एक व्हिडीओ मनोरंजन मराठी या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.हा सोहळा लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये खरं तर, विशाल, सोनाली, विकास आणि मीनल ही चौकडी पाहायला मिळत आहे. अर्थातच बी टीमचं रियुनिअन दिसून येत आहे. परंतु या व्हिडीओमध्ये विशाल आणि सोनाली दोघे एकत्र फोटो शेत असताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे मीनल आणि विकासची माजमस्ती सुरु आहे. सोनाली आणि विशालला असं एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. नुकतंच विशाल, विकास आणि मीनलने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये हे तिघे विशालच्या नव्या कारमधून राईड करत असल्याचं दिसलं होतं. त्यांनतर चाहत्यांनी सोनालीला पण बोलावून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता या व्हिडीओनंतर सर्वांचीच ही इच्छा पूर्ण झाली आहे. (हे वाचा: ‘दीपू’ ठरली सर्वाधिक Followers असणारी पहिली मराठी अभिनेत्री ) बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली आणि विशालमध्ये फारच जवळीकता निर्माण झाली होती. या दोघांमध्ये एक खास नातं तयार झालं होतं. शोमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी शिजतंय असच सर्वांना वाटत होतं. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यांना एकत्र पाहण्याची सर्वांचीच इच्छा होती. परंतु अचानक शोमध्ये आपलं सौंदर्यावर प्रेम असून सोनाली ही आपली फक्त एक मैत्रीण असल्याचं सांगत सर्वांचाच भ्रमनिराश केला होता. तसेच शोमध्ये या दोघांच्यात बराच वाद झाला होता. विशालने सोनालीवर अनेक आरोप लावले होते. त्यांनतर या दोघांच्या नात्यात फूट पाहायला मिळाली होती.