मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जातं. या मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.
'फुलपाखरु' या मालिकेने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर तिच्या प्रसिद्धीत भर पडली होती.
हृता दुर्गुळे सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. अभिनेत्रीच्या प्रसिद्धीत दिवसेंदिवस भर पडत आहे.
त्यामुळेच हृता दुर्गुळे मराठी अभिनेत्रींमध्ये सर्वात जास्त इन्स्टा फॉलोअर्स असणारी अभिनेत्री ठरली आहे.