JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 3 च्या घरातील ही मीनल शाह नक्की आहे तरी कोण?

Bigg Boss Marathi 3 च्या घरातील ही मीनल शाह नक्की आहे तरी कोण?

सध्या मराठी बिग बॉसच्या घरात मीनल शाहचे नाव सतत घरात तर चर्चेत असतेच आणि घराबाहेर देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे मराठी बिग बॉसची (bigg boss marathi season 3) चर्चा आहे. नेहमीप्रमाणे यंदाचा सीजन देखील काहीसा हटके पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉसच्या घरात फक्त कलाकार मंडळीच नाही तर काही सामाजिक क्षेत्रातील तसेच किर्तन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे देखील दिसत आहे. यामुळेच खर तर यंदाचा मराठी बिग बॉसचा सीजन काहीसा वेगळा आणि हटके ठरत आहे. घरातील प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. यात जय दुधाणे आणि मीनल शाह (meenal shah) यांची नावे वेगळ्या अर्थाने घेतली जातील कारण हे कलाकार स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मराठी बिग बॉसमध्ये (meenal shah biography) दाखल झाली आहेत. सध्या मराठी बिग बॉसच्या घरात मीनल शाहचे नाव सतत घरात तर चर्चेत असतेच आणि घराबाहेर देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे मीनल शाह ही अमराठी असताना देखील तिच्या अस्खलित मराठी बोलण्याने ती मराठीच असल्याचे जाणवते. अनेकजण सोशल मीडियावर तिच्या मराठी बोलण्याचे कौतुक देखील करतात. तसेच आपल्या कामगिरीमुळे मीनल प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे त्यामुळे मीनल शाह कोण आहे याबाबत आपण जाणून घेणार आहे. हे वाचा : आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं नातं मीनल मुळची मुंबईकर मीनलचा जन्म मुंबईत झाला आहे. ती लहान असतानाच तिचे आई आणि वडील दोघेही विभक्त झाले होते त्यामुळे मीनल आणि तिच्या भावाचा सांभाळ तिच्या आईनेच केला आहे. वडील गुजराती जरी असले तरी तिची आई मराठी असल्याने त्या दोघांचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. तिचे शालेय शिक्षण वांद्रे पूर्व येथील आयइएस न्यू इंग्लिश स्कूल मराठी माध्यमातून झाले होते. त्यामुळे मराठी भाषेची तिला उत्तम जाण आहे. शिवाय आई मराठी असल्याने तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष आदर देखील आहे.

संबंधित बातम्या

रोडीजमुळे मीनलला नाव आणि प्रसिद्धी मिळाली मीनल या क्षेत्राकडे कशी वळली असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर मीनल एक उत्तम डान्सर आहे यासोबतच तिला अभिनयाची आवड देखील आहे. तिने मॉडेलिंग देखील केली आहे. 2017 साली एम टीव्हीच्या रोडीज या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये ती कंटेस्टंट बनून गेली होती. यात कठीण टास्क खेळून ती सेमी फायनलिस्टपर्यँत पोहोचली होती. रोडीज या रिअॅलिटी शोमुळे मिनलला तुफान प्रसिद्धी मिळाली अगदी सोशल मीडियावर तिच्या फॅनफॉलोअर्सची संख्या देखील वाढली होती. नानचाकू आणि मार्शलआर्टस्चे प्रशिक्षण घेतलेल्या मिनलला वेगवेगळ्या टास्कदरम्यान याचा खूप फायदा झाला होता. या शोनंतर मीनलने काही जाहीरातीत देखील दिसली. यामुळेच ती मनोरंजन क्षेत्राशी जोडली गेली. हे वाचा : Bigg Boss Marathi: जयवर भडकले महेश मांजरेकर;चावडीवर दिला ओव्हर कॉन्फिडन्स कमी करण्याचा सल्ला मीनल आता मराठी बिग बॉसच्या घरात कुठपर्यंत मजल मारते हे पाहणे ठरणार उत्सुकतेचे ठरणार यासोबतच मिनलने स्वतःचे युट्युब चॅनल सुरू केले आहे. ज्यात तिचा रोडीजचा प्रवास आणि तिच्या डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतील. हिंदी रिअॅलिटी शो गाजवलेली मीनल आता मराठी बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. यात ती प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसत आहे. हिंदी रिऍलिटी शो गाजवल्यानंतर मीनल आता मराठी बिग बॉसच्या घरात कुठपर्यंत मजल मारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या