मुंबई, 05 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे चर्चा मराठी बिग बॉसच्या सीजन तीनची (Bigg Boss Marathi 3) आहे. या खेळातील स्पर्धक या शोची रंगत वाढवत असतात. यंदाचा बिग बॉस मराठीचा सीजन देखील चांगलाच गाजत आहे. अभिनेता अक्षय वाघमारे **(Akshay Waghmare )**देखील यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहे. त्यांची शांत राहणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी अक्षयने एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. या घरात जाण्याआधी त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला **(Organ Donation)**होता. त्याच्या या निर्णयामुळे अक्षयचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अक्षयने मराठी बिग बॉसच्या घऱात जाण्यापूर्वी मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात आदर निर्माण केला आहे. त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. याबाबत, संबंधित संस्थेकडे त्याने मरणोत्तर अवयव दानाचे संमतीपत्र भरून देखील दिले आहे. त्या संमती पत्रानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड, स्वादुपिंड, किडनी आणि त्वचा दान करणार आहे. विशेष म्हणजे, याबद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. वाचा :Bigg Boss Marathi 3 च्या घरात जय पडला प्रेमात! कुणाला केलं प्रपोज पाहा VIDEO अक्षय वाघमारे कोण आहे ? अक्षय वाघमारे याचा जन्म 1988मध्ये मुंबईत झाला. मुंबईतच त्याने शिक्षण पूर्ण केले. इतकेच नाही तर त्याने मॉडेल कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्याने याच विषयामध्ये पुण्यातून मास्टर्सही केले आहे.अक्षय हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. अक्षयने मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. मॉडेलिंगबरोबरच त्याला फिटनेसची देखील आवड आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रीय असलेला अक्षय त्याच्या फिटनेसेचे व्हिडिओ सातत्याने शेअर करत असतो. मॉडेलिंग, फिटनेस फ्रिक असलेल्या अक्षयला अभिनयासाठी विचारणा झाली. तेव्हा काही तरी वेगळे करायचे या उद्देशाने त्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि इथे तो रमला. 2019 मध्ये अक्षय वाघमारेला ‘हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही’ हा किताब मिळाला आहे. वाचा : VIDEO - नऊवारी साडीत Bend over; मराठमोळ्या लूकमध्ये रूचिरा जाधवचे इंग्रजी गाण्यावर ठुमके अक्षय ज्येष्ठ विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे. अक्षय वाघमारेने आतापर्यंत फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या मराठी सिनेमांत काम केले आहे. त्याशिवाय ‘ती फुलराणी’ या मालिकेतही तो दिसला होता.
अक्षय राजकीय नेते अरुण गवळीचा जावई आहे. अक्षयने अरुण गवळीची मुलगी योगिताशी मे 2020 लग्न केले. हे लग्न गवळीचा बालेकिल्ला असलेल्या दगडी चाळीमध्ये झाले होते. या लग्नाची खूप चर्चाही झाली होती. या लग्नाला फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. 7 मे 2021 रोजी अक्षय आणि योगिताला मुलगी झाली आहे.