रोहित रुचिरा
मुंबई, 16 नोव्हेंबर: बिग बॉस मराठी च्या घरातून मागच्या आठवड्यात अभिनेत्री रुचिरा जाधव घराबाहेर पडली. घरातून बाहेर निघताना रुचिरा आणि रोहित यांच्याच काही वाद झाले. ज्यानं रुचिरा नाराज होती. घराबाहेर पडताना देखील तिनं ‘रोहितला बाहेर आल्यावर बोलू तुला माहिती आहे रुचिरा काही विसरत नाही’, असं म्हटलं. यावरून दोघांमध्ये वाद झालेत हे लक्षात आलं. तर घराबाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं . यावरून बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला. मात्र रुचिरानं याचं उत्तर दिलं आहे. NEWS18लोकमतशी संवाद साधताना रुचिरानं तिच्या आणि रोहितच्या नात्यावर बिग बॉसमधील भांडणाचा काही परिणाम होणार का? यावर भाष्य केलं. रुचिरा काय म्हणाला पाहा. रोहितबरोबरच्या नात्याविषयी बोलकाना रुचिरा म्हणाली, ‘आमचं नातं इतकं तकलादू नव्हतं की कोणत्याही गोष्टीमुळे ते पटकन तुटेल. पण काही गोष्टी घडतात त्याकडे दर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे काही गोष्टी बोलून सॉल होतील असा मला विश्वास आहे. आतमध्ये मी स्वत:ला अनेक कंट्रोलमध्ये ठेवलं. मी माझ्याकडून खूप इनपुट दिले अर्थात समोरूनही आले. पण मला आता थोडासा वेळ हवाय तो मला घेऊ देत. आता मला माझी काळजी घ्यायची. हेही वाचा - बिग बॉसमुळे लव्हबर्ड्सच्या नात्याला तडा? घरातून बाहेर पडताच रुचिरानं केलं रोहितला अनफॉलो रुचिरा पुढे म्हणाली, इथे फक्त आम्ही इन्व्हॉल नाही आमची फॅमिलीही इन्व्हॉल आहे. मी कोणताही निर्णय पटकन घेणारी मुलगी नाहीये. पण मला थोडा वेळ द्या. त्यालाही थोडा वेळ द्या. मी पटकन कोणताही निर्णय घेणार नाही. आम्हाला भेटुन 3 वर्ष पूर्ण झालीत आता’.
बिग बॉसमधल्या भांडणाविषयी रुचिरा म्हणाली, ‘त्या गोष्टी गेममध्ये झाल्या. त्या गोष्टी घरात झाल्या. प्रेम आणि गेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि रुचिराला या दोन गोष्टी वेगळ्या ठेवता येतात. तिने प्रेमात गेम नाही आणला. खेळात तिनं प्रेम जपलं. या दोन गोष्टी मी नक्कीच वेगळ्या ठेवू शकते. तसंच ज्या गोष्टी अनसॉर्ट आहेत त्या मी नेहमीच संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. घरात जे काही झालं त्याचा मी विचार करेनच पण आता मी माझा विचार करेन. आता मी बाहेर आल्यानंतर मला स्वत:ला जपायचं आहे. माझी प्रायोरिटी मी स्वत:आहे.
लग्नाच्या गोष्टी आम्ही आमच्या हातात ठेवल्यात ‘आम्ही बिग बॉसच्या घरात जातानाही आमची फॅमिली लग्नाविषयी बोलली होती. पण लग्नाच्या गोष्टी आम्ही आमच्या हातात ठेवल्या आहेत. त्यात आम्ही आमच्या फॅमिलीची मतही ग्राह्य धरतो. माझ्यासाठी माझी फॅमिली आणि माझं करिअर या गोष्टींसाठी प्रायोरिटी आहे. रोहित माझ्या फॅमिलीचाच एक भाग आहे. त्यामुळे आताच्या क्षणी माझं करिअर हिचं माझी प्रायोरिटी आहे आणि हे फिक्स आहे’, असं रुचिरानं सांगितलं.