अमृता धोंगडे
मुंबई, 04 मार्च : मागच्या वर्षात छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी’ हा शो चांगलाच गाजला. यातील मुख्य कारण म्हणजे घरातील स्पर्धक. बिग बॉस मराठीचा चौथा सिझन संपून बरेच दिवस उलटले असले तरी काही ना काही कारणामुळे हे स्पर्धक चर्चेत राहतात. या शोची आणि घरातील सदस्यांची चर्चा काही संपत नाही. अभिनेता अक्षय केळकर यंदाच्या सीझनचा महाविजेता ठरला. परंतु बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांची तुफान चर्चा झाली. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे कोल्हापूरची लवंगी मिर्ची अभिनेत्री अमृता धोंगडे होय. अमृताने बिग बॉसच्या घरात टॉप 4 मध्ये मजल मारली होती. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या या सीजनच्या घरात आणि प्रेक्षकांच्या मनात अभिनेत्री अमृता धोंगडेने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणून ती प्रसिद्ध झाली. अमृता या सीझनच्या शेवट्पर्यंत बिग बॉसच्या घरात टिकून राहिली. तिच्या खेळीने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉस मराठीमुळे सहभागी झालेल्या स्पर्धकांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. या शोमुळे स्पर्धकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता अमृता सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत तिच्या आयुष्याविषयी अपडेट देत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यावरून अमृता लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. Prajakta Mali: शाहरुखच्या ‘स्वदेस’ मध्ये प्राजक्ता माळीने साकारलीये ‘ही’ भूमिका; विश्वास बसला नसेल तर पाहा फोटो अमृता धोंगडेने नुकताच एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या हातावर आणि पायांवर सुंदर मेहंदी सजलेली दिसत आहे. अमृताने खास आपल्या हात आणि पायांवर मेहंदी काढून घेतली आहे. यावरून अमृताला मेहंदी किती आवडते हे लक्षात येते. हे पाहून मात्र दुसऱ्याच चर्चांना जोर आला. अमृताचा हा व्हिडीओ पाहून ती लग्न करणारे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशाच कमेंट्स चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.
अमृताच्या या मेहंदीच्या व्हिडिओवर चाहत्यांनी, ‘अमृतालग्न ठरली की काय लग्नाला बोलाव’, ‘अमृता मेहंदी काढलीस तर लग्न करून घे’, ‘छान दिसतेस’ अशा कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे अमृताचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अमृता खरंच कधी लग्न करणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
अमृता धोंगडे ही मूळची कोल्हापूरची आहे. अमृताने याआधी झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत काम केलं आहे. यामध्ये तिने ‘सुमी’अर्थातच सुमनची भूमिका साकारली होती. मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे अमृता धोंगडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. तर बिग बॉस मराठीमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. आता ती यानंतर कोणत्या शो मध्ये झळकणार हे बघणं महत्वाचं आहे.