JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video: सावत्र आईविषयी पहिल्यांदाच बोलली सुम्बुल तौकीर ; म्हणाली, 'आता आमचं कुटुंब...'

Video: सावत्र आईविषयी पहिल्यांदाच बोलली सुम्बुल तौकीर ; म्हणाली, 'आता आमचं कुटुंब...'

नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात सुम्बुलनं आपल्या सावत्र आईविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यामुळे सुम्बुल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

जाहिरात

सावत्र आईविषयी पहिल्यांदाच बोलली सुम्बुल तौकीर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

.मुंबई, 9 जुलै- इमली आणि बिग बॉस 16 सारख्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकीर खान सध्या तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुले चर्चेत आहे. सुंबुल आणि तिची छोटी बहिण यांनी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात सुम्बुलनं आपल्या सावत्र आईविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हायरल व्हिडिओत सुम्बुलला पुरस्कार मिळाल्यानंतर होस्ट एक प्रश्न विचारताना दिसत आहे, तू वडिलांसारखी आहेस, हे नेहमी सांगतेस. पण, तुझ्या यशस्वी कारकिर्दीत आईचाही तितकाच खारीचा वाटा असेल ना? या प्रश्नावर सुम्बुल म्हणते,पहिल्यापासूनच माझ्याबरोबर आई नव्हती. म्हणजेच माझ्या वडिलांचा घटस्फोट झाला, तेव्हा मी फक्त सहा वर्षांची होती. तसेच माझी बहीण तीन वर्षांची होती. काही दिवसांपूर्वी मी वडिलांचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. आता माझ्या जवळ अजून एक छोटी बहीण आहे, जी तीन वर्षांची आहे. त्यामुळे आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे. तिचं हे उत्तर तिच्या चाहत्यांना देखील भावलं आहे. अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं आहे. वाचा- ‘त्याने मला साडीची पिन काढायला लावली…’ हेमा मालिनींचा धक्कादायक खुलासा सुंबुलचे वडील तौकीर हसन खान आणि नीलोफर यांनी इस्लाम धर्मानुसार पारंपरिक पद्धतीनं निकाह केला. नातेवाईक आणि काही जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला. सुंबुल आणि तिची छोटी बहिण सानियाचं तिच्या वडिलांनी पालन पोषण केलं आहे.

संबंधित बातम्या

सुंबुलच्या नव्या आईचं नाव नीलोफर आहे. ती घटस्फोटीत असून तिला अडीच वर्षांची मुलगी आहे. निलोफरचं देखील हे दुसरं लग्न आहे.सुंबुलने वडिलांच्या दुसऱ्या निकाहाचे सगळे फोटो शेअर केले होते पण त्यात नव्या आईचा चेहरा काही दाखवलेला नव्हता.

दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना तौकिर खान एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, माझ्या दोघी मुली गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मागे लागल्या होत्या. अखेर माझ्या मोठ्या भावंडांनी आणि माझ्या मुलींनी या लग्नासाठी होकार मिळवला आहे. वडिलांच्या होकारानंतर बहिणीनं मिळून वडिलांचे लग्न लावून दिलं. आता हे कुटुंब आनंदात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या