किरण माने बिग बॉस मराठी 4चे दुसरे फायनलिस्ट ठरलेत.
मुंबई, 4 मार्च - किरण माने सोशल मीडयावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. किरण माने यंदा बिग बॉस मराठीच्या सीजनमध्ये दिसले होते. बिग बॉसची ट्रॉफी त्यांनी जिंकली नसली तरी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात ते नक्की यशस्वी झाले आहेत. त्यांनी घरातून बाहेर पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. किरण माने यांची पोस्ट नेमकी आहे तरी काय? किरण माने म्हणतात की, मला बिग बॉसच्या आठवणींत नको इतकं अडकून पडायचं नाही, पण एक मात्र खरं की काळजाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा लै लै लै भारी आठवणी दिल्यात बिगबाॅसनं… माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं… ज्यासाठी आयुष्यभर खपलो, ते 100 दिवसांत दिलं… भरभरून… आभाळ भरून मिळतंय अजूनही. संघर्षाचं सोनं होतंय… खूप कामं करतोय… नविन कामांसाठी रोज फोन येताहेत. महाराष्ट्रभर गांवोगांवी बोलावून लोक सत्कार करताहेत ते वेगळंच !! जादू केलीय जादू, त्या नादखुळा शंभर दिवसांनी !!! Love You Bigg Boss 💓बिग बॉस मराठीनं त्यांचं आय़ुष्य कशाप्रकारे बदललं याचा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
याशिवाय किरण माने यांनी महेश मांजेरकरांचा बिग बॉस मराठीच्या घरातील पहिला दिवसाचा एक व्हिडिओ पोस्ट करत आणखी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, आग्ग्गाय्याय्यायाया… काय भन्नाट बनवलाय राव ह्यो व्हिडीओ ! नादखुळा !! पयल्या दिवशी बिगबाॅसच्या घरात जाताना महेश मांजरेकरांनी खतरनाक ओळख करुन देत ह्यो सुरु केला आन् अंगावर काटा आला भावांनो… शंभर हत्तींचं बळ आलं. कलर्स मराठीमधल्या ज्यांनी कुनी यासाठी कष्ट घेतले त्या सगळ्यांना कडकडीत सलाम !
जे बोललो ते करूनच बाहेर आलो. खेळातला समदा विरोध झुगारुन शंभर दिवस खनखनखनखनखन नाणं वाजवलं. होती नव्हती ती सगळी ताकद लावली. कशाची पर्वा न करता खरंखुरं वागलो. नो आडपडदा. काय हुईल ते हुईल. पन जे हाय ते हाय !!! बाहेर तुम्हा सगळ्यांची मनं जिंकू शकलो. भरुन पावलो. आल्यापास्नं अख्ख्या महाराष्ट्रातनं प्रेमाचा, मायेचा वर्षाव चाल्लाय. लोक घर शोधत येतायत. हारफुलांनी घर भरुन गेलंय. अजून काय पायजे भावांनो? आनंदाचे डोही आनंद तरंग….
किरण माने बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विविध प्रोजेक्टवर काम करत आहेत. सद्या ते एक सिनेमाच्या शुटींग करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी गोव्यातून फोटो पोस्ट केले होते. या घऱातून आल्य़ापासून ते अनेकवेळा आपल्या घरातील दोस्त मंडळीना भेटताना दिसतात.