जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मी बीचवर बिअर पीत..' किरण माने गोव्याच्या किनारी, फोटोंनी रंगली चर्चा

'मी बीचवर बिअर पीत..' किरण माने गोव्याच्या किनारी, फोटोंनी रंगली चर्चा

'मी बीचवर बिअर पीत..' किरण माने गोव्याच्या किनारी, फोटोंनी रंगली चर्चा

सध्या किरण माने गोव्यात आहेत, त्यांचे गोव्याच्या किनाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. किरण माने यांच्या फोटो इतकीच त्यांच्या पोस्टची देखील जोरदार चर्चा रंगलेली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी- अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. किरण माने यांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चाहत्यांचे लक्षवेधून घेत असतात. समाजातील विविध घटनांवर ते सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून भाष्य करत असतात. सध्या किरण माने गोव्यात आहेत, त्यांचे गोव्याच्या किनाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. किरण माने यांच्या फोटो इतकीच त्यांच्या पोस्टची देखील जोरदार चर्चा रंगलेली आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ? बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर किरण माने यांना काही नवीन प्रोजेक्ट मिळाले आहे. ते सध्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शुटींगसाठी किरण माने गोव्यात गेले आहेत. यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. सोबत फोटो देखील शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत किरण माने हे बीचवर सेल्फी घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते गोव्याच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच इतर दोन फोटो ते बीचवर बसून गोव्याचा आनंद घेत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन देखील दिले आहेत. वाचा- ‘पण आता लग्नानंतर ..‘लेकाच्या बर्थडेनिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी दिला खास सल्ला ‘गोवा ! प्रसन्न सुर्योदय… भन्नाट, नादखुळा बीच…आणि थोड्याच वेळात लाईट – कॅमेरा – ॲक्शन. एकतर शुटिंगसाठी गोव्यात येणं म्हणजे निव्वळ सुख. त्यात सीन असाय की मी बीचवर बीयर पीत पहुडलोय… मज्जा !’ अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे. किरण मानेंनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. किरण माने यांचा जन्म 5 एप्रिल 1970 रोजी सातारा जिल्ह्यातील मायणी गावात झाला. शालेय शिक्षणापासूनच त्यांना नाटक आणि नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती, पण त्यांचे जीवन तितके सोपे नव्हते. आपल्या कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे.

जाहिरात

किरण माने यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकांची आवड होती आणि नंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी किरण ऑटोमोटिव्ह नावाचे दुकान सुरू केले आणि ते त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस होते. त्यांनी त्यांच्या दुकानात गाड्यांचे तेल विकायला सुरुवात केली, पण नंतर त्यांना कमीपणा वाटू लागला की आपण काय करतो, त्यांच्या आयुष्यात अभिनय आणि नाटकाशिवाय आयुष्य फक्त बकवास आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मग त्यांना पंडित सत्यद्रव कार्यशाळेच्या संदर्भात पेपरमध्ये एक जाहिरात दिसली म्हणून त्यांनी त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता, त्यानंतर त्यांनी त्यांच्या दुकानाला कुलूप लावले आणि ते पुन्हा कधीही उघडले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात