JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Shiv Thakre: 'मीच खरा...' एमसी स्टॅनने विजेतेपद जिंकताच शिव ठाकरेची पहिली प्रतिक्रिया चर्चेत

Shiv Thakre: 'मीच खरा...' एमसी स्टॅनने विजेतेपद जिंकताच शिव ठाकरेची पहिली प्रतिक्रिया चर्चेत

अखेर एमसी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत या पर्वाच विजेतेपद जिंकलं आहे. आता त्याच्या विजयावर फर्स्ट रनरअप ठरलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरेची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.

जाहिरात

शिव ठाकरे- एमसी स्टॅन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी : ‘ बिग बॉस’ 16 चा ग्रँड फिनाले अखेर काल पार पडला. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत या टॉप पाच स्पर्धकांपैकी हा शो कोण जिंकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर एमसी स्टॅन या सीझनचा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅन हा असा स्पर्धक होता ज्याचं बिग बॉसच्या घरात येण्याआधी जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं, परंतु सुरुवातीला काही आठवडे त्याला या शोमध्ये रस नव्हता. अखेर एमसी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत या पर्वाच विजेतेपद जिंकलं आहे. आता त्याच्या विजयावर फर्स्ट रनरअप ठरलेल्या मराठमोळ्या शिव ठाकरे ची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. बिग बॉसच्या अंतिम टप्यात शिव आणि एमसी स्टॅन टॉप २ मध्ये पोहचले होते. एमसी स्टॅन जिंकला तर शिव फर्स्ट रनरअप ठरला. एमसी स्टॅन बिग बॉसचं विजेतेपद  जिंकला असला तरी शिव मात्र प्रेक्षकांच्या मनातील विजेता आहे अशा चर्चा नेटकरी करत आहेत. त्यानंतर आता शिवच्या प्रतिक्रियेने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. हेही वाचा - Sidharth- Kiara: सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनला अवतरलं बॉलिवूड; पण आलियाच्या उपस्थितीने वेधलं विशेष लक्ष रविवारी रात्री ग्रँड फिनालेमध्ये होस्ट सलमान खानने विजेत्याची घोषणा केली. ट्रॉफीशिवाय एमसी स्टॅनला बक्षीस रक्कम आणि कारही मिळाली. दुसरीकडे, ट्रॉफी जिंकण्याच्या सर्व शक्यता असतानाही शिवला प्रथम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एक प्रबळ दावेदार, ज्याने त्याचा मित्र एमसी स्टॅनकडून ट्रॉफी गमावली. फिनालेनंतर मीडियाला प्रतिक्रिया देताना शिव म्हणाला कि, ‘साहजिकच मला विजेतेपद जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप उत्कटतेने खेळ खेळलो. एखाद्या कारणासाठी आवाज उठवणे असो किंवा कोणत्याही कामात माझे सर्वोत्तम देणे असो, मी माझे 100 टक्के दिले आहेत. किमान हिंदी प्रेक्षक मला ओळखत आहेत याचा मला आनंद आहे.’

संबंधित बातम्या

शिव ठाकरे यांनी ट्रॉफी जिंकली नसली तरी ती त्याच्या मित्राला मिळाला याचा त्याला आनंद आहे. तो म्हणाला, ‘मला आनंद आहे की ट्रॉफी संघाकडेच आली. एमसी स्टॅन माझा मित्र आहे. आमच्यात फरक एवढाच आहे की मी खरा खेळाडू आहे, तर स्टॅन हा खरा माणूस आहे. तो खेळ जिंकण्यासाठी कधीही खेळला नाही. घराच्या आतल्या प्रवासात तो खरा माणूस राहिला आणि म्हणूनच त्याला ट्रॉफी मिळाली.

शालीन भानोत, अर्चना गौतम, शिव ठाकरे, एमसी स्टेन आणि प्रियांका चहर चौधरी टॉप 5 मध्ये पोहोचल्या होते. शालीन फिनालेतून सगळ्यात आधी  बाहेर पडला. मात्र, त्याला एकता कपूरसोबत मोठा शो मिळाला. त्यानंतर अर्चना बाहेर आली. प्रियांकाला टॉप 2 मध्ये स्थान मिळू न शकल्याने प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला. शेवटी शिव आणि एमसी स्टॅन टॉप २ स्पर्धक ठरले आणि सलमानने अखेर एमसी स्टॅनला विजेता म्हणून घोषित केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या