JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BB16 : अखेर सलमान खानही हटला मागे; साजिद खान प्रकरणात उचललं कठोर पाऊल

BB16 : अखेर सलमान खानही हटला मागे; साजिद खान प्रकरणात उचललं कठोर पाऊल

‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून प्रेक्षक संतापले आहेत. त्यानंतर आता साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जाहिरात

साजिद खान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोबर : सध्या बिग बॉस 16 हा शो जोरात सुरू आहे. बिग बॉसचं  घर म्हणजे वाद विवाद आलेच. हा कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहतो.  ‘बिग बॉस हिंदी’च्या 16 व्या पर्वाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सध्या बिग बॉस घरातील एका सदस्यांमुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो सदस्य म्हणजे साजिद खान . स्पर्धक म्हणून त्याने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून प्रेक्षक संतापले आहेत. त्यानंतर आता साजिद खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला शो मधून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपटसृष्टीतील महिलांवर अत्याचार झाला त्या रोषातून मीटू प्रकरणाला सुरुवात झाली होती. त्यात अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांची नावे समोर आली होती. या प्रकरणात साजिद खानवर महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता त्यामुळे महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या साजिद खानला ‘बिग बॉस’मध्ये पाहून प्रेक्षक संतापले आहेत. अनेक अभिनेत्रींनीही त्याविषयी  संताप व्यक्त केला आहे. त्याला या शो मधून काढण्याची मागणी अनेक महिला प्रेक्षकांकडून होत असताना आता सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही याला विरोध दर्शविला होता. आता एवढा विरोध होत असलेला पाहून त्याला या शो मधून बाहेर काढण्याचा निर्णय सलमान खानने  घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. हेही वाचा - BB16: सौंदर्याला किस करणं शालिनला पडलं महागात; बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा ई- टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार साजिद खान एका आठवड्यात रिअॅलिटी शोमधून बाहेर पडू शकतो.  शोचा होस्ट सलमान खाननेही साजिद खानची हकालपट्टी करण्याची मागणी मान्य केली आहे. सलमान खानच्या एका जवळच्या सांगितले आहे कि, ‘सलमान खानसाठीही ही परिस्थिती नाजूक आहे. कारण तो साजिद खानची बहीण फराह खानचा चांगला मित्र आहे. फराह खाननेच सलमान खानला साजिदला मदत करण्यास सांगितले होते, जे सलमान खानने मान्य केले.’ त्यामुळे आता साजिद खानची बिग बॉसच्या घरातून खरच हकालपट्टी केली जाणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

नुकतंच  दिया और बाती हम या मालिकेतील अभिनेत्री कनिष्का सोनीनेही एक खळबळजनक गोष्ट उघड करत लक्ष वेधलं होतं. एका निर्मात्याने कनिष्काला घरी बोलवून तिचं पोट दाखवण्याची मागणी केली होती असं तिने सांगितलं. कनिष्काने नकार दिल्यानंतर तिला सिनेमाची ऑफरही नाकारली होती. पण कनिष्काने त्या निर्माता दिग्दर्शकाचं नाव जाहीर केलं नव्हतं, पण आता नेमका साजिद खान बिग बॉस १६ शोमध्ये आला तेव्हा मात्र कनिष्काने बिग बॉसच्या निर्मात्यांकडे हा तोच निर्माता असल्याची बातमी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या