JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16 finale: शिव ठाकरेच होणार बिग बॉस 16 चा विजेता? फिनालेपूर्वी व्हायरल होतोय 'तो' व्हिडीओ

Bigg Boss 16 finale: शिव ठाकरेच होणार बिग बॉस 16 चा विजेता? फिनालेपूर्वी व्हायरल होतोय 'तो' व्हिडीओ

आज म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉसच्या या सोळाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी या घरातील आपला माणूस शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

जाहिरात

शिव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी :  अखेर ‘बिग बॉस 16’चा शेवट जवळ आला आहे. राडा, मैत्री, भांडणं आणि प्रेम अशा अनेक गोष्टींमुळे बिग बॉसचा हा सीझन प्रचंड गाजला. अखेर आता या सीझनचा शेवट आज होणार आहे. आज ‘बिग बॉस 16’ च्या टॉप-5 स्पर्धकांपैकी एक या सीझनचा विजेता होईल. ट्रॉफीसाठी शिव ठाकरे , प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टेन यांच्यात चुरशीची लढत दिसणार आहे. आज म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी ‘बिग बॉसच्या या सोळाव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.  त्यापूर्वी या घरातील आपला माणूस शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. सलमान खानच्या या शोमध्ये शिव ठाकरे सध्या खूप चर्चेत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये शिव ठाकरेचे बिग बॉस 16 चे विजेते म्हणूनही वर्णन केले जात आहे. या शो मधून शिव ठाकरेच फॅन फॉलोईंग प्रचंड वाढलं. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात ठिकठिकाणी त्याचे चाहते आहेत. त्याला पूर्ण सीझनमध्ये प्रेक्षकांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे शिव  विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हेही वाचा - Shiv Thakare: बिग बॉस मध्ये गेला अन् नशीब उजळलं! शिव ठाकरेच्या हाती लागला सलमान खानचा सिनेमा? हा व्हिडिओ ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनचा आहे जो शिव ठाकरेने जिंकला होता. व्हिडिओमध्ये होस्ट महेश मांजरेकर शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांचा हात धरून स्टेजवर उभे आहेत. विजेत्याचे नाव जाहीर होण्याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरेचे नाव विजेते म्हणून घोषित केले. शिवचे नाव ऐकताच त्याला धक्का बसतो. त्याचं नाव ऐकताच सगळ्यांना प्रचंड आनंद होतो. टाळ्यांचा कडकडाटात शिव ठाकरे बिग बॉसची ट्रॉफी स्वीकारतो.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनचा आहे जो शिव ठाकरेने जिंकला होता. व्हिडिओमध्ये होस्ट महेश मांजरेकर शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांचा हात धरून स्टेजवर उभे आहेत. विजेत्याचे नाव जाहीर होण्याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरे यांचे नाव विजेते म्हणून घोषित केले. शिवाचे नाव ऐकताच त्याला धक्का बसतो. तो त्याचा आनंद सावरू शकत नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिव ठाकरेचे चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत आहेत आणि आशा करत आहेत की इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि शिव ठाकरे बिग बॉस 16 चा विजेता झाल्यावर असेच वातावरण पाहायला मिळेल. शिव ठाकरे यांना विजयी करण्यासाठी चाहते वेडे होत असून भरभरून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी चाहते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदान करू शकतात. ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून आहे. सलमान खान दोन आठवड्यांनंतर शोचा होस्ट म्हणून परत येत असून तो विजेत्याच्या नावाची घोषणा करणार आहे. सध्या ‘बिग बॉस 16’ मधील टॉप-5 स्पर्धकांमध्ये शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, शालीन भानोत आणि अर्चना गौतम आहेत. शिव, प्रियांका आणि स्टेन हे टॉप-3 स्पर्धक आहेत आणि त्यापैकी एकच विजेता असेल असे सांगण्यात येत आहे. पण तो कोण असेल, याची वाट पाहावी लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या