'बिग बॉस १६' चा ग्रँड फिनालेसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या पर्वाचा विजेता कोण ठरणार? अशी धाकधूक सर्वांच्याच मनात आहे.
सर्व स्पर्धकांना दमदार टक्कर देत शिव फिनालेपर्यंत पोहोचला आहे. सध्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चढाओढ सुरु आहे.
सोशल मीडियावर शिव ठाकरे विनर असल्याचे अनेक ट्रेंड्स सुरु आहेत. आता शिव खरंच ट्रॉफी घेऊन येणार का? याकडे सर्व लोकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान टीव्ही ९ च्या रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेच्या आईने आपल्या लेकाच्या खोलीतील ते गुपित उघड केलं आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवच्या आईने पुढे सांगितलं, 'शिवच्या खोलीमध्ये शिवने ट्रॉफी आपल्या नावावर करण्याबाबत लिहूनही ठेवल आहे.
शिव रोज सकाळी उठून ते लिहिलेलं पाहायचा. त्यामुळे ही ट्रॉफी आता खरंच घरी यायला हवी असही त्या म्हणाल्या.