शिव ठाकरे
मुंबई, 11 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितक्याच विवादित ‘बिग बॉस’ या शोची तुफ़ान चर्चा सुरु आहे. हा शो आपल्या शेवटच्या टप्प्यावर आहे. शोचा अगदी एक दिवस शिल्लक आहे. उद्या या शोच्या सोळाव्या सीजनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदा कोणता स्पर्धक ट्रॉफीवर नाव कोरणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजणच उत्सुक आहेत. दुसरीकडे शो सपंण्याआधीच एका स्पर्धकाच नशीब चमकलं आहे. हा स्पर्धक इतर कुणी नसून मराठमोळा शिव ठाकरे आहे. बिग बॉसचा सोळावा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा अनेक स्पर्धक प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरले आहेत. या सीजनलासुद्धा अफाट लोकप्रियता मिळाली आहे. शोची वाढती टीआरपी लक्षात घेऊनच यंदाचा सीजन एक महिना वाढदविण्यात आला होता. दरम्यान येत्या 12 फेब्रुवारीला बिग बॉसच्या सोळाव्या सीजनचा फिनाले पार पडणार आहे. स्पर्धकांसोबतच त्यांचे चाहतेसुद्धा फिनालेसाठी प्रचंड उत्सुक आहेत. (हे वाचा: Tanya Abrol Wedding: ‘चक दे इंडिया’च्या आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ; CID मध्येही साकारलीय भूमिका ) या सीजनमध्ये मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनचा विजेता शिव ठाकरेसुद्धा सहभागी झाला होता. शिवने आपल्या साध्या राहणीमानाने आणि जेंटलमन पर्सनॅलिटीने सर्वांचं मन जिंकलं आहे. शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनेकवेळा शिव सोशल मीडियावर ट्रेंड होत असतो. अभिनेत्याला विविध सेलिब्रेटी आणि चाहते सपोर्ट करत आहेत. शिव ठाकरे या सीजनच्या टॉप 5 मध्ये पोहोचला आहे. दरम्यान शिवसोबत प्रियांका चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि शालिन भनौत यांनी टॉप 5 मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.
शिव ठाकरे एकीकडे प्रेक्षकांचं मन जिंकत असतानाच दुसरीकडे त्याच्यासाठी एक गुड न्यूज आहे. शिव ठाकरेला बिग बॉस संपण्याआधीच कलर्स वाहिनीवरील एक मोठा शो ऑफर झाल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेला रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी’ हा लोकप्रिय शो ऑफर झाल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, लेटेस्ट एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातच रोहित शेट्टीला दोन स्पर्धकांची निवड करण्यास सांगितलं होतं. यावेळी रोहित शेट्टीने शिव ठाकरे आणि अर्चना गौतमला निवडल्याचा समोर आलं आहे.
येत्या 12 फेब्रुवारीला बिग बॉसच्या सोळाव्या सीजनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यामध्ये कोणता स्पर्धक बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी सर्वच स्पर्धकांना बाहेरुन चाहते, सेलिब्रेटी आणि कुटुंबियांचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळत आहे.