'बिग बॉस १६' सध्या आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. लवकरच सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.
यंदाच्या पर्वात मराठमोळा शिव ठाकरेसुद्धा यामध्ये सहभागी झाला आहे. शिव ठाकरे उत्तम खेळी करत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.
परंतु ट्रॉफी जिंकण्यासाठी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. चाहते, सेलिब्रेटी विविध क्षेत्रातील मान्यवर शिवला भरभरुन प्रेम आणि प्रोत्साहन देत आहेत.
यामध्ये त्यांनी लिहलंय, 'अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन अमरावती येथील शिव ठाकरे बिग बॉस हिंदीच्या फायनलपर्यंत पोहोचला आहे त्याला वोट करा'. असं त्यांनी म्हटलं आहे.
शिव ठाकरेला मिळत असलेल प्रेम आणि पाठिंबा पाहून तो विजेता होईल असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. दरम्यान शिव ठाकरेने याआधी बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन जिंकला होता.