अभिनेत्री चित्राशी रावतच्या लग्नाच्या काही दिवसानंतरच 'चक दे इंडिया'ची आणखी एक अभिनेत्री तान्या अब्रोल लग्नबंधनात अडकली आहे. तान्या अबरोल 'चक दे इंडिया'मध्ये बलबीर कौरच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती.तसेच ती लोकप्रिय शो CID मध्येही दिसली होती.
गुरुवारी तान्याने बॉयफ्रेंड आशिष वर्मासोबत लग्न केलं. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी वधूसोबत पोज देतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.जे मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेता अभिनव शुक्लाने शुक्रवारी पत्नी रुबिना दिलैक आणि तान्या अब्रोलसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना तान्याच्या लग्नाची माहिती दिली आहे. तान्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तान्याने लग्नात हिरव्या आणि लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तिने गळ्यात सुंदर नेकलेसही घातला होता. तर रुबिना काळ्या आणि सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीत दिसत होती. अभिनवने ग्रे पँटसोबत हाय-नेक शर्ट घातला होता.
अभिनवने फोटोसोबतच कॅप्शनमध्ये लिहिलय की, 'आम्ही अनेक वर्षे एकाच छताखाली घालवले. तू लहान आहेस पण जास्त हुशार आहेस आणि मी जास्त मजेदार आहे. आयुष्यात चढ-उतार आले, पण तू एक बहीण, मित्र आणि आधार बनून राहिलीस. तान्या अब्रोल, तुला वधूच्या रूपात पाहून आनंद झाला'.