JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट; शिव ठाकरेला मारहाण करणाऱ्या अर्चनाची पुन्हा होणार एंट्री ?

Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट; शिव ठाकरेला मारहाण करणाऱ्या अर्चनाची पुन्हा होणार एंट्री ?

बिग बॉसमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बिग बॉसनं अर्चनाला पुन्हा घरात येण्याची संधी दिली आहे. काय घडणार नक्की पाहा

जाहिरात

बिग बॉस 16

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  10 नोव्हेंबर : बिग बॉसचा 16 सीझन सध्या टेलिव्हिजनवर हिट ठरत आहे. सगळे स्पर्धक घरात आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण सध्या या घरातील एक स्पर्धक चांगलाच गाजतोय तो म्हणजे शिव ठाकरे. मराठी बिग बॉसचा विजेता असणाऱ्या शिवकडे आता प्रेक्षक  बिग बॉस १६ चा विजेता म्हणून पाहत आहेत. अनेक प्रेक्षक फक्त शिव ठाकरेसाठी बिग बॉस 16 पाहतात अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. शिव ठाकरेनं देखील त्याच्या साधेपणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकलीत. सलमान खानकडूनही शिवचं कौतुक करण्यात आलं आहे. असं असताना बिग बॉसच्या घरात मराठमोळ्या शिववर टास्कदरम्यान दुसऱ्या स्पर्धकांनी हात उचलला आणि एकच खळबळ माजली होती. बिग बॉसच्या घरात अर्चना गौतम ने शिवला मारहाण केली. यामुळं  बिग बॉस संत्पत झाले आणि त्यांनी अर्चनालाथेट बाहेरचा रस्ता दाखवला. शिववर हात उचलल्यानं सध्या सोशल मीडियावर या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त होत होती. पण आता याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बिग बॉसनं  अर्चनाला पुन्हा घरात येण्याची संधी दिली आहे. होय, बिग बॉस 16 मधून मोठी बातमी समोर येत आहे की निर्माते अर्चना गौतमला शोमध्ये परत आणणार आहेत. हेही वाचा -  Rashmika Mandanna: सततच्या ट्रोलिंगमुळे दुखावली रश्मिका; पोस्ट लिहीत म्हणाली, ‘इतकेदिवस शांत होते पण…’ बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला. बिग बॉसच्या घरात अर्चना गौतम या आठवड्यात खेळत असताना तिच्या रागावर ताबा मिळवू शकली नाही.  तिच्यात आणि शिव ठाकरेमध्ये वाद झाला. दोघांमध्ये फिजिकल भांडणं झाली.  अर्चनानं शिववर हात उचलला असं देखील म्हटलं जातं आहे. शिव वर हात उचलल्यानं बिग बॉस संत्पत झाले असून अर्चनाला बिग बॉसनं थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिववर हात उचलल्यानं सध्या सोशल मीडियावर या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त होत होती. पण आता याविषयी मोठी बातमी समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अर्चनाने कुटुंबातील सदस्यांची आणि शिवची माफी मागितली आणि तिने स्वतःची चूक कबूल केली. त्यामुळे बिग बॉसने अर्चनाला माफ केले आणि आता तिला पुन्हा शोमध्ये आणण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात. त्यामुळे अर्चना गौतम पुन्हा बिग बॉसच्या घरात राडा घालताना पाहायला मिळू शकते. आता अर्चना गौतमच्या पुनरागमनाची बातमी ऐकून तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.पण शिव ठाकरेचे चाहते मात्र नाराज होतील.

शिव ठाकरे नंतर अर्चना गौतम या शोचा जीव असल्याचे मानले जाते. ती अशी स्पर्धक आहे जी बिग बॉसमध्ये रोज नवनवीन विनोद करते आणि तिच्या नौटंकीने खूप हसवते. कधी ती तिच्या फालतू गोष्टींवरून घरच्यांना चिडवते, तर कधी घरच्यांशी अशी मारामारी करते, सगळ्यांची बोलती बंद होते. अर्चनाच्या शब्दांचा आणि संवादांचा सोशल मीडियावर बोलबाला असतो. अशा परिस्थितीत बिग बॉसची जान म्हटल्या जाणाऱ्या अर्चनाला बाहेर काढून शो मेकर्स कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाहीत. यामुळेच सर्वांची पंचाईत झाली असून यापुढेही अर्चनाचा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या