JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरातून अब्दू रोजिकची पुन्हा एक्झिट; त्याच्या आठवणीने ढसाढसा रडला शिव

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरातून अब्दू रोजिकची पुन्हा एक्झिट; त्याच्या आठवणीने ढसाढसा रडला शिव

मध्यंतरी अब्दुने घरात पुन्हा एंट्री घेतली होती. पण त्याच्या चाहत्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. अब्दुला निरोप देताना शिव ठाकरेची अवस्था मात्र फारच बिकट झाली.

जाहिरात

अब्दू रोजिक- शिव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जानेवारी:  ‘ बिग बॉस ’ चा प्रत्येक सीझन चांगलाच लोकप्रिय ठरतो. बिग बॉसचा 16 वा सीझन सुरु असून यंदाच्या सीझन चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. जसा जसा बिग बॉसच्या शो पुढे सरकत आहे तस तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येत आहे.  या आठवड्यात बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक पाहायला मिळाला. घरातील सगळयात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे अब्दू रोजीक . तो कायमच चर्चेत राहतो. बिग बॉसमुळे त्याचे चाहते घराघरात आहेत. मध्यंतरी अब्दुने घरात पुन्हा एंट्री घेतली होती. पण त्याच्या चाहत्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. कारण आता या आठवड्यात अब्दुला पुन्हा बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. बिग बॉस 16 च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये  भारती सिंग आणि हर्ष घरात लिंबाचियामध्ये जातात आणि स्पर्धकांसोबत मजा करतात. यासोबतच काही खेळही खेळले जातात, ज्यात शिव ठाकरेचा संघ जिंकतो. तर दुसरीकडे या आठवड्यात दोघे घरातून बाहेर पडणार आहेत. त्यामध्ये एक नाव अब्दू रोजिक हे आहे. आता यासंबंधी कलर्सने एक प्रोमो रिलीज केला आहे. हेही वाचा - Shiv Thakare: ‘तिने शिवसोबत लग्नाचा..’; शिव ठाकरेच्या आईचं वीणा जगतापबाबत मोठं वक्तव्य बिग बॉस 16 चा आगामी भाग अब्दु रोजिकच्या चाहत्यांसाठी खूप भावूक असणार आहे. बिग बॉस 16 चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अब्दू रोजिक घरातून बाहेर पडताना दिसत आहे. एकीकडे अब्दू रोजिक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला तर दुसरीकडे शिव आणि साजिद खान त्याच्यासाठी रडताना दिसले.

संबंधित बातम्या

बिग बॉस फॅन क्लबवर सतत बातम्या येत होत्या की, अब्दू रोजिक शोमधून बाहेर पडणार आहे. आता प्रोमो पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की बिग बॉसमधील अब्दु रोजिक प्रवास अखेर  संपला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसने म्हटले आहे की, 16 सीझनमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. यानंतर अब्दू बोगद्याच्या दिशेने जातो. निम्रत त्याला म्हणते, अब्दू, आता थांब. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य बोगद्याजवळ येऊन उभे राहतात आणि अब्दू बिग बॉसच्या घराचा कायमचा निरोप घेतो.

मध्यंतरी पहिल्यांदा अब्दू बाहेर गेला तेव्हा त्याला बिग बॉसने बाहेर काढलं नसून त्याच्या मॅनेजमेंट टीमनेच बिग बॉसला तशी विनंती केली होती त्यानंतरच त्याला शोमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली अशी बातमी समोर आली होती. अब्दू रोजिकवर एक व्हिडिओ गेम तयार करण्यात येणार आहे, ज्यासाठी त्याची गरज होती. तेव्हा अब्दु बाहेर पडताच त्याच्या गेमचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. टीझरमध्ये अब्दू एका टेबलासमोर बर्गर ठेवून उभा आहे. त्यानंतर तो बॉक्सिंग रिंगमध्ये प्रवेश करतो, परंतु त्याचा चेहरा दाखवला जात नाही. आता अब्दू घरातून बाहेर पडण्याचं कारण अजून समोर आलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या