JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'नको तिथे विष ओकू नका...'; म्हणत Bigg Boss Marathi फेम उत्कर्ष शिंदेनी शेअर केला 'तो' VIDEO

'नको तिथे विष ओकू नका...'; म्हणत Bigg Boss Marathi फेम उत्कर्ष शिंदेनी शेअर केला 'तो' VIDEO

उत्कर्ष शिंदेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिग बॉसमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. नागपंचमी स्पेशल ही पोस्ट त्यानं शेअर केली आहे. पाहा व्हिडीओ

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 जुलै : ‘बिग बॉस मराठी’ हा एक लोकप्रिय रिअॅलिटी शो असून लाखो लोक या शोला फॉलो करतात. या शोचा प्रत्येक सीझन हा प्रचंड गाजत असतो. याप्रमाणेच ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सीजनही प्रचंड गाजला. या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमधून प्रसिद्दी झोतात आलेला गायक म्हणजे उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde). बिग बॉसनंतर उत्कर्ष शिंदेची लोकप्रियता आणखीनच वाढली. तेव्हापासून तो सतत चर्चेत असतो. अशातच उत्कर्षनं एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. उत्कर्ष शिंदेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिग बॉसमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्यानं ‘बिग बॉस मराठी 3’ च्या आठवणी शेअर केल्या आहेत. बिग बॉस 3 मध्ये घालवलेले ते 100 दिवस नक्कीच माझ्यासाठी मनोरंजक तर होतेच. पण त्याही सोबत स्वतःला स्वतःची नवीन ओळख करून देणारे ठरले, असं म्हणत उत्कर्ष शिंदेनी पोस्टमधून आठवणींना उजाळा दिला आहे. हेह वाचा -  ‘पहिल्यांदाच आम्हाला सोबत पाहिलंय का?’; कियाराचा वाढदिवस साजरा करुन मुंबईत पोहचताच Papsवर भडकला सिद्धार्थ कधी साडी नेसून बाई होऊन उखाणा घेत डांस केला, तर कधी चिमणी उडाली वर लाकडाच्या फ्रेम ला लटकून डांस, तर कधी हा बेभान होऊन “नागीन डांस केला “. नागपंचमी आलीच आहे तर सर्व हिंदू चाहत्यांना मित्रांना माझ्या तर्फे नाचत भरभरून शुभेचा देतो. विषारी सापांपासून नक्कीच सावध राहा पण सर्वच साप विषारी नसतात हे ही तितकंच लक्षात ठेवा. प्राणी मात्रांवर प्रेम करा. नको तिथे फणा काढू नका. नको तिथे विष ओकु नका, असंही उत्कर्षनं त्यांच्या या पोस्टमधून म्हटलं.

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या दिवशी बिग बॉस चा नागीण डांस पुन्हा तुमच्यासाठी सादर करतोय म्हणत उत्कर्ष शिंदेनं मजेदार व्हिडीओ शेअर केलाय. या मजेदार व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडीओ अनेकांच्यापसंतीस उतरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या