JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / video : मीरा-उत्कर्षमध्ये काहीतरी शिजतंय; घरातील सदस्य करतायत उलट सुलट चर्चा

video : मीरा-उत्कर्षमध्ये काहीतरी शिजतंय; घरातील सदस्य करतायत उलट सुलट चर्चा

सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये उत्कर्ष मीराचा हात दाबून देत आहे. यावरून घऱातील सदस्य मीरा आणि उत्कर्षमध्ये काही तरी शिजत असल्याची चर्चा करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 डिसेंबर- बिग बॉस मराठीच्या घरातील **(bigg boss marathi 3)**विकास आणि मीराचा स्पेशल डान्स असो वा किचनमधील सुगरण मीरा, प्रेक्षकांनी आतापर्यंत तिचे भरभरून कौतुक केले आहे. चाहत्यांनी दिलेल्या आजवरच्या प्रतिसादाने ती नेहमीच सेफ होत आली आहे. महेश मांजरेकर यांनी मीराच्या वागण्यावरून वेळोवेळी चावडीवर परखड मत देखील व्यक्त केले. परंतु आता सुरु असलेल्या उलट सुलट चर्चेमुळे प्रेक्षकांमध्ये घरातील सदस्यांबद्दल नाराजी दिसत आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये उत्कर्ष मीराचा हात दाबून देत आहे यावरून घऱातील सदस्य मीरा आणि उत्कर्षमध्ये काही तरी शिजत असल्याची चर्चा करत आहेत. मीराच्या इन्स्टाला हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे व म्हटले आहे की,आपल्या मीराच्या हाताला लागलं आहे ह्याचा तिने issue केला नाही ते बहुतेक तिचं चुकलं कारण उत्कर्ष तिचा हात दाबून देत होता फक्त ह्या एकच विडिओ च आता भांडवल केलं जातं आहे.ह्याला विकसित बुध्दी म्हणावं की अविकसित?मैत्री काय असते ही व्याख्याच मुळात यांना माहित नसावी. काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून?, असा प्रश्न मीरानं थेट प्रेक्षकांना हा व्हिडिओ शेअर करत विचारला आहे. वाचा : Video : नव्या मालिकेत भार्गवी चिरमुले दिसणार आईच्या भूमिकेत विकासच होता जो सोनालीसाठी विशालच्या वेळी मागच्या आठवड्यात पाठीशी उभा राहिला होता. आज तोच विकास सोनाली बरोबर मीरा आणि उत्कर्षच्या मैत्रीच्या नात्यावर वर शंका घेतो, हे कितपत बरोबर आहे. विकास आणि सोनाली मधील चर्चेत मीऊ मीऊ अशी हिंट तो देतो पण सोनाली समजले नसल्याचे दाखवते. विकास आणि सोनाली या दोघांच्या नात्यावर शंका घेताना दिसत आहेत.   वाचा : आणखी एक लोकप्रिय मराठी मालिका जाणार दुसऱ्या भाषेत; कन्नड भाषेत होणार रिमेक यावरून विकास माइंड गेम खेळतोय हे प्रेक्षकांना जाणवलं आहे. या अगोदरही कॅप्टन्सी पासून विलिप्त असलेला विकास भलताच एक्टीव्ह झालेला पाहायला मिळाला. विशाल असो की जय यांच्यामध्ये आता विकास थोडासा वरचढ ठरेल असं चित्र तयार होत आहे. मीराची ही जमेची बाजू प्रेक्षकांसमोर मांडल्याबद्दल तिच्या चाहत्यांनी आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

उत्कर्षची बायको स्वप्नजा जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात भेटायला आली तेव्हा, मीराने उत्कर्षला किचनमधील गोष्टी शिकवल्या याबद्दल तिने मनापासून कौतुक केले होते. बिग बॉसच्या घरातील कुजबुजीला बाजूला सारून मीरने आवाहन केले आहे की, काही नाती रक्ताची नसली तरीही आपल्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. मात्र यावरून विकास पाटील आणि सोनाली पाटील मात्र सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. यावरून महेश मांजरेकर त्यांची शाळा घेणार का हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या