JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bhumi Pednekar : सगळ्यांसमोरच भूमीने बॉयफ्रेंडला केलं किस; 'तो' मिस्ट्री मॅन नक्की आहे तरी कोण?

Bhumi Pednekar : सगळ्यांसमोरच भूमीने बॉयफ्रेंडला केलं किस; 'तो' मिस्ट्री मॅन नक्की आहे तरी कोण?

भूमी चक्क एका मिस्ट्री मॅनला किस करत आहे असा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. आता भूमीला कॅमेऱ्यासमोर किस केलेला हा मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे याची देखील माहिती समोर आली आहे.

जाहिरात

भूमी पेडणेकर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तिचा हा व्हिडीओ सिद्धार्थ कियाराच्या रिसेप्शन दरम्यानचा आहे. याचे चर्चा होतेय कारण या व्हिडिओमध्ये भूमी चक्क हा मिस्ट्री मॅनला  किस करत आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान  व्हायरल होतोय. आता भूमीला कॅमेऱ्यासमोर किस केलेला हा मिस्ट्री मॅन  नक्की कोण  आहे याची देखील माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 12 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीत बीटाउनचे सर्व सेलेब्स आले होते. अजय देवगण, काजोल, करीना, करण जोहर, मनीष मल्होत्रा, दिशा पटानी, क्रिती सेनन ते शनाया कपूरसह सर्व स्टार्स सहभागी झाले होते. यादरम्यान भूमी पेडणेकरही गोल्डन साडीत स्टायलिश अवतारात दिसली. या पार्टीनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला ज्यामध्ये भूमी पेडणेकर आणि यशचा लिपलॉकचा क्षण कैद झाला. हेही वाचा - TMKOC: ‘तारक मेहता..’ च्या जेठालालला सतावतेय दयाबेनची आठवण; म्हणाले ‘मी तिला मिस….’ व्हिडिओमध्ये भूमी तिच्या कारमध्ये बसताच एक व्यक्ती तिला सी ऑफ करण्यासाठी येतो आणि यावेळी अभिनेत्रीच्या ओठांवर किस करतो असं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकीकडे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत, तर दुसरीकडे ही व्यक्ती कोण आहे, असे काहीजण विचारू लागले आहेत. भूमी पेडणेकरचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेला हा मिस्ट्री मॅन कोण होता हे आता स्पष्ट झाले आहे. त्याचे नाव यश कटारिया असल्याचे सांगितले जात आहे. यश हा भूमी पेडणेकरचा बॉयफ्रेंड आहे.

संबंधित बातम्या

भूमी पेडणेकरसोबत दिसलेल्या व्यक्तीचे नाव यश कटारिया आहे. यश कटारिया 28 वर्षांचे असून तो व्यवसायाने व्यापारी आहे. तसेच बिल्डर असलेला यश कटारिया हा बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा जवळचा मित्र आहे. भूमी यशला डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. मात्र, या वृत्तांची अद्याप पुष्टी झालेली नाही. अशा परिस्थितीत जेव्हा यश कटारिया भूमीला सी ऑफ करायला गाडीपर्यंत पोहोचला आणि लिप-लॉक केला तेव्हा तो पापाराझींच्या कॅमेऱ्यापासून वाचू शकला नाही.

33 वर्षीय भूमी पेडणेकर इंडस्ट्रीत तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. भूमी पेडणेकरने २०१५ मध्ये दम लगा के हैशा या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यादरम्यान त्याने या भूमिकेसाठी वजन वाढवले ​​होते. या चित्रपटात तिचे वजन ८९ किलो होते. मात्र चित्रपटानंतर ती पुन्हा फिट झाली आहे. ती शेवटची गोविंदा नाम मेरा मध्ये दिसली होती. जिथे त्याने कियारा अडवाणी आणि विकी कौशलसोबत काम केले. आता ती लवकरच मॉब, द लेडी किलर आणि अफवा से तक्षक या चित्रपटात दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या