JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD: भारती सिंग सोशल मीडियावरही हिट; फोटो पोस्ट करून कमावते कोट्यवधी रुपये

HBD: भारती सिंग सोशल मीडियावरही हिट; फोटो पोस्ट करून कमावते कोट्यवधी रुपये

भारतीचे केवळ इन्स्टाग्रामवरच 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिनं केलेल्या पोस्टवर काही तासांत लाखो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 2 जुलै**:** भारती सिंग (Bharti Singh) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. भारती आपल्या अनोख्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आज भारतीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Bharti Singh birthday) भारती मालिका आणि टीव्ही शोंसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Bharti Singh annual income) या मीडियाचा वापर ती चाहत्यांना विनोद सांगून हसवण्यासाठी तर करतेच पण त्यासोबत ती कोट्यवधींची कमाई देखील करते. ‘निर्मात्यांना फोन करुन भीक मागते’; कंगनानं पुन्हा एकदा घेतला तापसीसोबत पंगा भारतीचे केवळ इन्स्टाग्रामवरच 40 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिनं केलेल्या पोस्टवर काही तासांत लाखो नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येतात. त्यामुळं ती सोशल मीडियाचा वापर अनेकदा विविध ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी सुद्धा करते. केवळ जाहिराती करुनच ती महिन्याला जवळपास दोन ते पाच कोटी रुपयांची कमाई करते. ब्रँडच्या डिमांडनुसार भारती तिचं मानधन ठरवते. शिवाय मीडिया रिपोर्ट्सनुसार सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी ती जवळपास एक लाख रुपये घेते. यामध्ये स्वाइप अप, सिंगल पिक्चर पोस्ट, व्हिडीओ, रील व्हिडीओ, ब्रँड अनाऊंसमेंट, ब्रँड कर्टसी या गोष्टींचा समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या