JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Rupa Dutta Arrested: पाकिटमारीच्या आरोपात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, बॅगेतून एवढी रक्कम जप्त

Rupa Dutta Arrested: पाकिटमारीच्या आरोपात प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक, बॅगेतून एवढी रक्कम जप्त

या घटनेमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीकडे चोरी केलेले 75000 रुपये जप्त करण्यात आले असून विधाननगर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलकाता, 13 मार्च: बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ताला (Rupa Dutta Arrested) एका अशोभनीय वर्तनाबद्दल अटक झाली आहे. असे वृत्त समोर आले आहे की, पाकिटमारी केल्याच्या आरोपात अभिनेत्री रुपा दत्ताला अटक करण्यात आली आहे. कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे बंगाली मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मीडिया अहवालांनुसार, अभिनेत्रीकडे चोरी केलेले 75000 रुपये जप्त करण्यात आले असून विधाननगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नेमकं काय घडलं? कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये काही पोलीस ड्युटीवर तैनात होते, त्यावेळी त्यांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकताना पाहिले. पोलिसांना तिचं वागणं संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिथे तिची चौकशी केली, पण तिने नीट उत्तरं दिली नाहीत. पोलिसांनी जेव्हा तिच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये 75000 रुपये आढळून आले. हे वाचा- PM नरेंद्र मोदी यांनी केलं The Kashmir Filesचे कौतुक, सिनेमाच्या टीमची घेतली भेट या महिलेला विधानगर नॉर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं, तेव्हा चौकशीअंती हे लक्षात आलं की ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता आहे. तिने केलेल्या गुन्ह्याची अभिनेत्रीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत आणि रुपा दत्ताला कोर्टात हजर केलं जाईल.

संबंधित बातम्या

अनुराग कश्यपवर केले आहेत गंभीर आरोप अभिनेत्री रुपा दत्ताने हिंदी तसंच बंगाली मालिकांमध्ये काम केलं आहे. बंगाली सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी ती चर्चेत आली होती, जेव्हा तिने दिग्दर्शन अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आणि ड्रग सप्लाय करण्याचे आरोप केले होते. रुपा दत्ता नावाच्या अनव्हेरिफाइड ट्विटर अकाउंटवरुन अनुराग कश्यपवर गंभीर आरोप करण्यात आले होते. तिने या ट्वीटमध्ये शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, तिने ‘जय मां वैष्णो देवी’ या मालिकेत माता वैष्णो देवीचेही काम केले आहे. या अभिनेत्रीच्या बाबतीत पाकिटमारीची घटना समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या