मुंबई 10 ऑगस्ट : सध्या सोशल मिडियावर एक मुलगा तुफान व्हायरल होत आहे. ‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyar) हे गाणं त्याने गायलं होतं. आणि त्यानंतर तो सोशल मीडिया वर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) सारख्या शो मध्ये देखील त्याने मागील आठवड्यात हजेरी लावली होती. हा लोकप्रिय मुलगा म्हणजेच सहादेव कुमार दिर्दो (Sahadev Kumar Dirdo). तर आता सहदेवला नवी कोरी कार मिळाली आहे. दरम्यान अद्याप ही कार नक्की कोणी दिली याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण सहदेवला कारची चावी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या नव्या कोऱ्या कारची किंमत 23 लाख रुपये इतकी आहे.
गेल्या काही दिवसांपासून सहदेव सतत चर्चेत आहे. सुरुवातीला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवकडून गाणं गाऊन घेत त्याचा सत्कार केला होता. तर त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही सहदेवच्या या गाण्यावर रील्स, व्हिडिओज बनवले होते. त्यामुळे त्याच्या गाण्याचे मोठे चाहते निर्माण झाले.
प्रसिध्द गायक आणि रॅपर बादशाहने (Badshah) देखील सहदेवला ऑफर देत एक बनवलं आहे. त्याचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. त्याने चंदिगढ ला सहदेवला भेटायला बोलवलं होत. त्या दोघांचा फोटो त्याने सोशल मीडयावर शेअर केला होता.
सिद्धार्थ जाधवचा लुक पाहून चाहत्यांना का आठवला रणवीर सिंग? पाहा अभिनेत्याचे हटके PHOTOSसहदेवला प्रसिद्ध रिॲलिटी शो इंडियन आयडॉल मधून देखील निमंत्रण मिळालं होतं. त्यावेळी सर्व स्पर्धक आणि जजेस नी त्याचसोबत गाणं म्हटलं. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतच आहे. त्यामुळे आता सहदेव गाण्यात आपलं करिअर करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.