JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ayushmann Khurrana: 'हाता-पायात काळा दोराही बांधायला हवा..', असं का म्हणाला आयुष्मान खुराना?

Ayushmann Khurrana: 'हाता-पायात काळा दोराही बांधायला हवा..', असं का म्हणाला आयुष्मान खुराना?

आयुष्मान खुराना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या पोस्ट आणि फोटोंच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट-   बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. या अभिनेत्याने स्वतः च्या कला कौशल्यावर मोठं यश मिळवलं आहे. आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये आयुष्मानचं नाव गणलं जातं. हा अभिनेता सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट शेअर करुन चाहत्यांचं लक्ष वेधत असतो. आजही असंच काहीसं झालं आहे. सध्या अभिनेत्याची नवी पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. आयुष्मान खुराना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या पोस्ट आणि फोटोंच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. चाहतेही त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रतिसाद देत असतात. नुकतंच अभिनेत्याने आपली एक नवी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्याने आपला ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत एक कॅप्शनही दिलं आहे. सध्या या फोटोपेक्षा कॅप्शनची जास्त चर्चा सुरु आहे. आयुष्मानने फोटो शेअर करत लिहलंय, ‘‘विमानाच्या आत, विंडो सीट A१ च्या खिडकीतून.. पुन्हा एकदा मास्क घालण्याची वेळ आलीये..असं ऐकण्यात आलं आहे संपूर्ण मुंबई शहर ताप आणि सर्दीसारख्या व्हायरल इन्फेक्शनसोबत लढा देत आहे. दरम्यान मी एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकतो. यामध्ये तुम्ही मिरच्याही घालू शकता.सोबतच आपण हाता-पायात काळा धागाही बांधूया.आपल्या सगळ्यांना नजर लागलीय’. असं म्हणत आयुष्मानने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

(हे वाचा: Laal Singh Chaddha: आमिरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ, आता पोलिसांत तक्रार दाखल **)** आयुष्मानच्या या पोस्टवर चाहते आणि त्याचे कलाकार मित्र भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ती पसंतदेखील केली जात आहे. अभिनेत्याबद्दल सांगायचं तर अभिनयासोबतच त्याला गाण्याची प्रचंड आवड आहे. तो एक उत्तम गायकसुद्धा आहे. त्याने अनेक सुपरहिट गाणी गायिली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या