JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अर्जुन कपूरनं का सोडलं दिग्दर्शन? सांगितला ‘कल हो ना हो’च्या सेटवरील किस्सा

अर्जुन कपूरनं का सोडलं दिग्दर्शन? सांगितला ‘कल हो ना हो’च्या सेटवरील किस्सा

काम करण्याऐवजी चित्रपटाच्या सेटवर जाऊन झोपायचा. हा चकित करणारा किस्सा स्वत: अर्जुननं सांगितला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 जुलै**:** अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल अर्जुननं आपल्या करिअरची सुरुवात एक दिग्दर्शक म्हणून केली होती. तो दिग्दर्शक निखिल अडवणी (Nikkhil Advani) यांचा सहाय्यक म्हणून काम करत होता. परंतु काम करण्याऐवजी चित्रपटाच्या सेटवर जाऊन झोपायचा. हा चकित करणारा किस्सा स्वत: अर्जुननं सांगितला. पाकिस्तानी मॉडेलची घरात घुसून हत्या; तपासात धक्कादायक सत्य आलं समोर टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं हा 18 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “त्या वेळी मी निखिल अडवाणी यांचा सहाय्यक म्हणून काम करत होतो. आम्ही शाहरुख खानच्या कल हो ना हो (Kal Ho Naa Ho) या चित्रपटाचं शूटिंग करत होतो. परंतु सेटवर जाऊन मी केवळ झोपायचो. माझं सर्व काम निखिल स्वत:च करायचे. त्यावेळी कोण कोणाचा सहाय्यक आहे हेच कळायचं नाही. अर्थात मी एक अत्यंत आळशी सहाय्यक होतो. त्यावेळी सेटवर सर्व कलाकार 10 ते 15 मिनिटं आधिच उपस्थित व्हायचे. अगदी शाहरुख सुपरस्टार असून देखील वेळेत यायचा. मात्र मी सर्वात उशीरा सेटवर पोहोचायचो. मला चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आवडायची त्यामुळे मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. परंतु दिग्दर्शन हे सोपं काम नाही. हे लवकरच माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.” भय इथले संपत नाही…! बलात्कारांच्या धमक्यांमुळे अभिनेत्रीचं जगणं मुश्कील ‘कल हो ना हो’ हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान आणि सैफ अली खान यांच्या जुगलबंदीमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानं 18 वर्षांपूर्वी जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. शिवाय निखिल अडवणी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील मिळाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या