सोशल मीडिया हा प्रसिद्धी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे जवळपास सर्वच सेलिब्रिटी चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
मात्र ही प्रसिद्धी अनेकदा सेलिब्रिटींच्या उलट अंगाशी देखील येते. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री प्रत्युशा पॉलसोबत घडला आहे.
तिला इन्स्टाग्रामवरुन बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांना वैतागून तिनं तब्बल 30 वेळा आपलं अकाउंट बंद केलं आहे. मात्र धमक्या काही थांबलेल्या नाहीत.
दरम्यान या प्रकरणी तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीसोबतच तिने पुरावा म्हणून इन्स्टाग्रामवरील मेसेजचे स्क्रीनशॉट देखील पोलिसांना दिले आहेत.
काही दिवसांतच धमक्या देणाऱ्या या सर्व युझरवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी प्रत्युशाला दिलं आहे.