JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'किती संस्कारी मुलगी' ए. आर. रेहमान यांच्या लेकीच्या साधेपणानं चाहत्यांचं जिकलं मनं, रिसेप्शन Video Viral

'किती संस्कारी मुलगी' ए. आर. रेहमान यांच्या लेकीच्या साधेपणानं चाहत्यांचं जिकलं मनं, रिसेप्शन Video Viral

ए. आर. रेहमान यांनी स्वत: आपल्या मुलीच्या रिसेप्शनचा (Reception) एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 मे- संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या (A. R. Rahman) घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. रेहमान यांची मुलगी खतिजा (Khatija Rahman) हिचा लग्नसोहळा नुकताच झाला. तमीळ सिंगर असलेल्या खतिजानं रियासदीन (Riyasdeen) रियाजशी निकाह केला आहे. त्यामुळे खतिजा आणि रियाससह संपूर्ण रेहमान कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लग्नानंतर काल (6 मे रोजी) रात्री रिसेप्शन पार पडलं. सध्या खतिजाच्या लग्नाचे फोटो (Wedding Photos) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. ए. आर. रेहमान यांनी स्वत: आपल्या मुलीच्या रिसेप्शनचा (Reception) एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नवीन नवरी असलेल्या खतिजाचा साधेपणा बघून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. खतिजा ही रेहमानच्या तीन मुलांपैकी एक आहे. 25 वर्षीय खतिजानं चेन्नईमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिनं डिसेंबर 2021 मध्ये रियासदीनसोबत एन्गेजमेंट केली होती. त्यानंतर आता पाच महिन्यांनी त्यांनी निकाह केला आहे. काल चेन्नईमध्ये शानदार रिसेप्शन पार पडलं. रियासदीन हा साउंड इंजिनीअर (Sound Engineer) आहे. विशेष म्हणजे तो दीर्घकाळापासून ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम करत आहे. वाचा- ‘..तिथं जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी’ सयाजी शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया रेहमान यांनी आपल्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये खतिजा आणि रियासदीन स्टेजवर उभे आहेत व त्यांचं फोटोसेशन (Photo session) सुरू असल्याचं दिसत आहे. सर्व पाहुणे नवविवाहित जोडप्याला (Newlywed Couple) शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत फोटो क्लिक करत आहेत. लग्नाच्या दिवसाप्रमाणेच रिसेप्शनच्या दिवशीही खतिजा खूपच सुंदर दिसत आहे. खतिजाला कायम पडद्याआड राहणं आवडतं म्हणून रिसेप्शनमध्येही तिनं मास्कच्या सहाय्यानं आपला चेहरा झाकलेला आहे. तिनं रिसेप्शनच्या दिवशी लाल आणि क्रीम रंगाचा सूट घातला होता तर डोक्यावर दुपट्टा होता. रेहमानचा जावई रियासदीननं निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, असं या व्हिडिओत दिसत आहे. वाचा- ‘या’ सिनेमाचा भाग असणं अभिमानास्पद, प्रसाद ओकची ‘चंद्रमुखी’साठी नव्हे तर…. खतिजा आणि रियासदीनचा रिसेप्शन व्हिडिओ पाहून चाहत्यांनी या कपलवर शुभेच्छांचा (Wishes) वर्षाव केला आहे. खतिजाच्या साधेपणानं (Simplicity) लोकांची मनं जिंकली आहेत. ‘माशाअल्लाह, किती संस्कारी मुलगी आहे. कुठल्याही प्रकारचा अॅटिट्युड नाही. याला साधेपणा म्हणतात. अल्लाह तुम्हाला आनंद देवो’, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. लग्नाच्या दिवशीही खतिजानं अगदी साधा मेकअप केला होता. लग्नाच्या दिवशीही तिने क्रीम कलरचा फ्लोरल सूट घातला होता आणि रियासदीननं क्रीम कलरची शेरवानी घातली होती.

संबंधित बातम्या

खतिजा आणि रियासदीन या जोडीला लोकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. रेहमान यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तर ते अगदी ‘मेड फॉर इच इदर’ आहेत असं वाटतंय. नवविवाहित जोडप्याचं अभिनंदन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या