JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Anushka Sharma-Virat Kohli मध्ये दुरावा, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

Anushka Sharma-Virat Kohli मध्ये दुरावा, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

‘विरुष्का’ मध्ये दुरावा आला आहे. स्वत: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने इन्स्टा पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिने विराटचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

जाहिरात

Anushka Sharma-Virat Kohli मध्ये दुरावा, पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 17 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anuskhka Sharma) हे अनेकांचं फेव्हरिट कपल आहे. दरम्यान दोघांचे अनेक फोटोही सातत्याने व्हायरल होत (Virat Kohli and Anuskhka Sharma Photos) असतात. दोघांच्या करिअरचं क्षेत्र जरी वेगवेगळं असलं तरी ते एकमेकांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ देत असतात. काही जाहिरातींमधूनही हे कपल आपल्याला एकत्र दिसलं आहे. मात्र आता ‘विरुष्का’ (Virushka Latest News) मध्ये दुरावा आला आहे. स्वत: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने इन्स्टा पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिने विराटचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. विरुष्कामधील या दुराव्याचं कारण आहे- क्वारंटाइन! अनुष्का शर्मा विराट कोहलीला चिअर करण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत तिला क्वारंटाईनमध्ये राहावे लागते. तिने विराटचे काही फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वाचा- Adhura: Sidnaaz ची अधूरी कहाणी! शेवटचं एकत्र दिसणार ही फेव्हरिट जोडी आता सगळीकडे युएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वारे वाहू लागले आहेत. युएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेत विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्काने दुबई गाठली आहे. याठिकाणाहून तिने हॉटेलचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. अनुष्का यावेळी हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. त्यावेळी विराट तिला पाहण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. कधी बाल्कनीतून तर कधी हॉटेलच्या लॉनवरुन तो पत्नी अनुष्काला ‘हाय’ करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो अनुष्काने शेअर केले आहेत. वाचा- ‘सोनाही सोना होगा…’ बप्पी लहरींच्या नातवामध्येही त्यांचीच छबी; VIDEO अनुष्काने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी या दोन कॅप्शनपैकी एक निवडू शकले नाही - ‘क्वारंटाइनमुळे हृदय आणखी प्रेमळ बनते आणि बबल जीवनातील प्रेम… तुम्हाला समजले असेलच.’ अनुष्काच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

अनेक सेलेब्सही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनुष्का शर्माच्या पोस्टवर रणवीर सिंग, सानिया मिर्झासह इतर स्टार्सनी कमेंट केल्या आहेत. रणवीरने ‘क्या यार..?’ असं म्हणत हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तर क्रिकेटपटू युझवेंद्र चहल याने देखील या पोस्टवर मजेशीर कमेंट केली आहे. तो म्हणतोय की, ‘भाभी जरा दूरच नाहीतर भैया आणखी एका आठवड्याचा एक्स्ट्रा क्वारंटाइन करतील.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या