मुंबई, 22 एप्रिल: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Latest Video) सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या खोडकर स्वभावाचा प्रत्यय अनेकदा सोशल मीडियाद्वारे आला आहे. अनेकदा विविध कार्यक्रमांच्या सेटवर देखील ती अशीच खोडकर असते. दरम्यान तिच्या बहिणीने अभिनेत्रीचा एक व्हिडीओ शेअर (Ankita Lokhande Funny Video) केला आहे, तो पाहून तर हसू आवरणार नाही. अंकिता एका रेस्टॉरंटमध्ये बसल्या बसल्या एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या डान्स मुव्ह्ज फारच विनोदी आहेत. अंकिताची बहिण अशिता साहू हिने हा व्हिडीओ अंकितासह शेअर केला आहे. यामध्ये अंकिता विचित्र डान्स मुव्ह्ज करताना दिसत आहे. अंकिताच्या शेजारी तिचा पती विकी जैन देखील बसला आहे. रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या टेबलवर बसूनच अंकिताचा हा Madness सुरू आहे. हा व्हिडीओ शूट करणाऱ्याही मध्येमध्ये हसू येत आहे तर, अंकिताही मध्येच तिचं हसू आवरू शकत नाही आहे. हे वाचा- ‘हा’ अभिनेता ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये मुख्य भूमिकेत; उर्मिला कोठारेसह शेअर करणार स्क्रीन हा व्हिडीओ अभिनेत्रीच्या बहिणीने पोस्ट केला आहे. तिने असं कॅप्शन दिलं आहे की, ‘याला साजेसं कॅप्शन सूचत नाही आहे.’ त्यावर अंकिताने कमेंट केली आहे ‘हे पोस्ट करण्यासाठी I Hate You’.
दरम्यान अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडीओ तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे तर काही इन्स्टाग्राम युजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. ‘काही वेळा अंकिता वेड्यासारखं वागते’, ‘अशाप्रकारे वागणं तुला शोभत नाही’, ‘ओव्हर अॅक्टिंग, ओव्हर कॉन्फिडन्स’ अशा काही नेगिटिव्ह कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत. तर काहींनी गंमतीत तिला मिस्टर बीनची गर्लफ्रेंड म्हटलं आहे. काही युजर्सनी तिने ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची कॉपी केल्याचेही म्हटले आहे. काहींना मात्र हा व्हिडीओ आवडला आहे. अनेकांनी स्मायली इमोजी आणि हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर काहींनी तिला फ्रेंड्स या सीरिजमधील मोनिका म्हटलं आहे.
दरम्यान अलिकडेच अंकिता बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीमध्ये दिसली होती. यावेळी तिच्या बनारसी साडीने सर्वांचं मन जिंकलं होतं. अंकिताने विकीसह केलेलं फोटोशूटही चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. गेल्यावर्षी अंकिता आणि विकी यांनी लग्न केलं, त्यानंतर ही जोडी विशेष चर्चेत आहे. ती पतीसह ‘स्मार्ट जोडी’मध्ये देखील दिसून आली होती.