JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आधी भाऊ गेला मग बाबा, एक्स बॉयफ्रेंडही...' मिलिंद सोमणच्या पत्नीने शेअर केला लहानपणातील तो कटू अनुभव

'आधी भाऊ गेला मग बाबा, एक्स बॉयफ्रेंडही...' मिलिंद सोमणच्या पत्नीने शेअर केला लहानपणातील तो कटू अनुभव

मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर (Milind Soman wife Ankita Konwar) सातत्याने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना प्रेरणा देत असते. बऱ्याच वेळा अंकिता सामाजिक विषयांवरही आपले मत मोकळेपणाने व्यक्त करताना दिसते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर : पॉप्युलर आणि सर्वात फिट मॉडल पैकी एक मानल्या जाणाऱ्या मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवर (Milind Soman wife Ankita Konwar) सातत्याने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना प्रेरणा देत असते. बऱ्याच वेळा अंकिता सामाजिक विषयांवरही आपले मत मोकळेपणाने व्यक्त करताना दिसते. आता अंकिताने एका व्हिडिओच्या माध्यमातून आयुष्यातील दु:खद (ankita konwars pain) अनुभव लोकांसमोर मांडला. काही घटना मनाला वेदना देतात असे तिनं सांगितलं आहे. अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं आपल्यावर ओढावलेल्या दु:खाचे  वर्णन केलं आहे. लहानपणी माझा छळ झाला, मी वसतिगृहात वाढले. परदेशात एकटी राहत होते. तेथे ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनी माझा विश्वासघात केला. मी माझा एक भाऊ गमावला, माजी प्रियकर गमावला, वडील गमावले. माझ्या दिसण्यावरून मला अनेक नावांनी हाक मारली जात होती. आता मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत असण्यावरून लोक मला जज करतात. जर तुम्ही माझ्याकडे आशावादी म्हणून पाहिले तर लक्षात ठेवा की मी आहे. स्वत: वर प्रेम करा, असं तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

मिलिंद सोमण यांची प्रतिक्रिया अंकिताची पोस्ट शेअर होताच तिला आता अनेक सेलेब्सचा पाठिंबा मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देताना, पती मिलिंद सोमण याने लिहिलं की, बेबी, तू आता त्यातून खूप पुढे आली आहेस. त्यावर रिप्लाय देताना अंकिता म्हणाली की, शुक्रिया मेरे साथी. अभिनेत्री, व्हीजे आणि मॉडेलने लिहिलंय, मेरी अंकी.

अंकिता कोंवरने 2018 मध्ये मॉडेल मिलिंद सोमणशी लग्न केले होते. या दरम्यान अंकिता अवघ्या 26 वर्षांची होती तर मिलिंद 52 वर्षांचा होता. दोघांच्या वयातील या मोठ्या अंतरामुळे दोघांनाही ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. दोघेही अनेकदा त्यांच्या रोमँटिक पोस्टसह सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या