JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ananya Panday: आदित्य रॉय कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर बोलली अनन्या; म्हणाली 'माझा लग्नाचा प्लॅन...'

Ananya Panday: आदित्य रॉय कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर बोलली अनन्या; म्हणाली 'माझा लग्नाचा प्लॅन...'

आदित्य आणि अनन्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, आजपर्यंत या अफवांवर कोणत्याही या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु कोणीही त्यांचं नातं नाकारलेलंही नाही. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनन्याने तिच्या डेटिंग लाइफबद्दल मोठा खुलासा केला आहे.

जाहिरात

अनन्या पांडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जुलै :   बॉलिवूडची प्रसिद्ध स्टारकिड अनन्या पांडे सध्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनन्या पांडे सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये रंगत आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत, त्यानंतर सर्वजण आदित्य आणि अनन्या रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, आजपर्यंत या अफवांवर कोणत्याही या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु कोणीही त्यांचं नातं नाकारलेलंही नाही. आता नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनन्याने तिच्या डेटिंग लाइफबद्दल मोठा खुलासा केला आहे. अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. या सर्वांची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये ‘अनन्या आणि आदित्य त्याच्या पार्टीमध्ये एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत होते’ असा खुलासा केला. यानंतर हे दोघे अनेक बी-टाऊन पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले, ज्यामध्ये त्यांच्या केमिस्ट्रीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून पदार्पण करणारी अनन्या पांडेने तिच्या रिलेशनशिपबाबत नेहमीच मौन बाळगलं आहे. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या डेटिंग लाइफशी संबंधित मोठा खुलासा केला आहे.

नुकत्याच झालेल्या या मुलाखतीत अनन्याला आदित्यसोबतच्या डेटिंगच्या अफवांवर विचारण्यात आले तेव्हा तिने मौनच बाळगलं. पण, अनन्या पांडे याविषयी बोलताना पुढे म्हणाली, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणे ही चांगली गोष्ट आहे, मी कोणाला डेट करत आहे याचा अंदाज लोकांनी लावला पाहिजे. पण मी लग्नासाठी अजून खूप लहान आहे. त्यामुळे माझा लग्नाबाबत कोणताही प्लॅन नाही.’ असा  खुलासा तिने केला आहे. तथापि, अभिनेत्रीला या क्षणी तिच्या डेटिंग जीवनापेक्षा तिच्या करिअरवर अधिक लक्ष द्यायचं आहे. गेल्या काही वर्षांत तिचे चित्रपट सातत्याने फ्लॉप ठरले आहेत, त्यामुळं वैयक्तिक आयुष्यापेक्षा अनन्याला सध्या करिअर जास्त महत्वाचं वाटतं. सनी देओलला टक्कर द्यायला घाबरला रणबीर कपूर? अ‍ॅनिमलच्या ‘या’ अपडेटने रंगलीय चर्चा अनन्या पांडेचा शेवटचा चित्रपट ‘लिगर’ बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला होता. पण अनन्याला याबद्दल काहीच खंत नाही. कारण हा तिच्या प्रवासाचाच एक भाग असल्याचं तिचं मत आहे. याविषयी बोलताना अनन्या म्हणाली की, ‘कोणत्याही चित्रपटात काम करणाऱ्या लोकांना चित्रपट किंवा शो बनवणे किती कठीण काम आहे हे माहीत असतं आणि त्यासाठी ते मन लावून मेहनत करतात. पण काहीवेळा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर निराश होऊ नये. अपयशातून शिकून पुढच्या चित्रपटात अजून चांगलं काम करायचं’ अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री पुढे ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ मध्ये तिच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच अनन्याकडे ‘खो गये हम कहाँ’ देखील आहे, ज्यामध्ये ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या