JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Amruta Subhash: ...आणि अनुप सोनी यांनी खाडकन थोबाडीत मारली; अमृताने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

Amruta Subhash: ...आणि अनुप सोनी यांनी खाडकन थोबाडीत मारली; अमृताने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा

अमृता सुभाषने जेव्हा अनुप सोनी यांच्याकडून जोरात थोबाडीत खाल्ली तेव्हा नेमकं काय झालं माहित आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 जुलै: अमृता सुभाष ही एक गुणी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे. अमृताचा बोलका आणि निखळ अभिनय नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकत आली आहे. अमृता नुकतीच ‘सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड’ या सिरीजमध्ये दिसून येत आहे. अमृता या सिरीजमध्ये अनुप सोनी (amruta subhash and anup soni) या अभिनेत्याची पत्नी आहे. या सिरीजमधला इंटेन्सिटीने भरलेला एक शॉट कसा शूट झाला याबद्दल एका मुलाखतीत ती नुकतीच बोलताना दिसली. अमृताला या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अनुप सोनी यांच्याकडून जोरात थोबाडीत खायची होती. त्यावेळी अमृता जराशी कचरत होती आणि त्यावेळी अनुप यांनी तिला बरीच मदत केली असं ती सांगते. अमृताच्या सुरुवातीच्या सीनमधेच तिचं अनुप यांच्याशी फार सुंदर नातं तयार झाल्याचं ती सांगते. एका न्यूज पोर्टलशी बोलताना अमृता सांगते, “अनुप यांचं पात्र सिरीजमध्ये सगळ्यात कठीण आणि कॉम्प्लेक्स होतं कारण स्वतःच्या बायकोला सोडून दुसरा संसार थाटणं याकडे आजही समाज वेगळ्या दृष्टीने बघतो तरी त्यांनी जिवंत केलं. माझे सुरुवातीचे सीन हे त्यांच्यासोबत होते. आम्ही ऑन स्क्रीन जितके भांडत होतो तितकेच ऑफ स्क्रीन धमाल करत होतो. आमच्या सुरुवातीच्या काही सीन्समध्ये ते मला थोबाडीत मारतात हा शॉट होता. त्यावेळी मला थोबाडीत मारलेली खरी हिवतु द्यायची होती, इमोशनसुद्धा द्यायच्या होत्या आणि भांडण सुद्धा करायचं होतं हे एकत्र कस जमेल याचं मला टेन्शन होतं. पण अनुप इतके ब्रिलियंट अभिनेते आहेत की त्यांनी सांगितलं होऊन जाईल करू आपण. दोन तीन रिटेक देऊनही हवी तशी प्रतिक्रिया येत नव्हती. आणि फायनल शॉटमध्ये त्यांनी मला अशी थोबाडीत मारली ज्याची मी अपेक्षा केली नव्हती पण त्याच वेळी त्यांनी मारलेला हात मला अजिबात लागला नाही पण एक धक्कादायक प्रतिक्रिया नक्कीच मिळाली. हे अजिबात ठरलेलं नव्हतं आणि त्यांनी ते ऐनवेळी करून हवी ती रिऍक्शन सहजपणे काढून घेतली.”

संबंधित बातम्या

“एक चांगला अभिनेताच आहे त्या परिस्थितीचा सुवर्णमध्य काढू शकतो ज्यात हवी ती प्रतिक्रिया सुद्धा मिळून गेली आणि मला अजिबात त्रास झाला नाही.” असं अमृता सांगते. हे ही वाचा-  Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्टला साकारायचेत छत्रपती शिवाजी महाराज; मराठमोळ्या दिग्दर्शकासमोर केला खुलासा अनुप यांनी दाखवलेलं प्रसंगावधान किती गरजेचं होतं याबद्दल ती त्यांचं कौतुक करते. अमृताने हा व्हिडिओ स्वतःच्या सोहळा मीडियावर शेअर केला असून त्यावर अनुप यांनी कमेंट करून केलेल्या कौतुकाबद्दल तिचे आभार मानले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या