JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Amruta Dhongade: 'मी या गोष्टी घेऊन फसले'; पाहा अमृताचा शॉपिंग डिझास्टर!

Amruta Dhongade: 'मी या गोष्टी घेऊन फसले'; पाहा अमृताचा शॉपिंग डिझास्टर!

(Misses Mukhyamantri) झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून घराघरात पोहोचलेली अमृता धोंगडे ही अभिनेत्री तिच्या आयुष्यात काही गोष्टी विकत घेतल्याचा पश्चाताप करते. काय आहेत या गोष्टी?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 8 जुलै: मराठी अभिनेत्रींना वेगवेगळ्या कारणासाठी सतत फॅशनशी निगडित अनेक गोष्टींची मदत लागत असते. कधी शूज, कधी लिपस्टिक कधी अजूनच काही अशा अनेक गोष्टी त्यांना रोजच्या आयुष्यात लागत असतात असं खूपदा पाहायला मिळतं. पण अनेकदा अशा गोष्टी विकत घेताना अनेक समस्या येतात. कधीतरी विकत घेतलेल्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा होतो. सध्या असाच अनुभव मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री (Amruta Dhongade) अमृता धोंगडेला आला आहे. या अभिनेत्रीने राजश्री मराठी च्या खास व्हिडिओमध्ये तिने आजपर्यंत शॉपिंग करताना तिला कोणत्या गोष्टी घेतल्याचा पश्चाताप झाला आहे याबद्दल काही किस्से आणि आठवणी सांगितल्या आहेत. अनेकदा ऑनलाईन शॉपिंग करताना तिला हा अनुभव आल्याचं तिने शेअर केलं. अमृताने सेलच्या नादात एकावर तीन गोष्टी मोफत अशी ऑफर पाहिली आणि ती त्याला बळी पडली. परिणामी तिच्याकडे एकसारखे सेम तीन शूजचे जोड आले आणि आता ते तसेच पडून आहेत. असंच एक जीन्स तिने ऑर्डर केली ज्याची साईझ इतकी चुकीची आली की अजूनही तिला ती जीन्स बसत नाही एवढी ती सैल आहे असं ती सांगते. हे ही वाचा-  Ashadhi Wari: ‘वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती…’; अभिनेत्री अश्विनी महांगडे सांगतेय वारीचा खरा अर्थ याच शॉपिंग डिझास्टरमध्ये (Amruta Dhongade shopping disaster) ती अजून एक किस्सा शेअर करते, “मला असं वाटत खरेदी करताना प्रत्येकानेच असे शॉपिंग डिझास्टरचे अनुभव घेतले असतील. मला तर अनेकदा पश्चाताप झाला आहे की मी ही गोष्ट का विकत घेतली. यातलाच एक किस्सा म्हणजे मी माझ्या ताईचं म्हणणं ऐकून एक बॅग खरेदी केली. मला 5000 ची बॅग 1000 रुपयात मिळत होती. मी डिस्काउंट बघून विचार केला आणि बॅग विकत घेतली. दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी त्या बॅगेचं बक्कल तुटलं आणि हातात आलं, अशा पद्धतीने माझे एक हजार रुपये सुद्धा वाया गेले”

संबंधित बातम्या

महिलांना खरेदी करायची भारी हौस असते असं म्हणतात. पण अनेकदा त्या हौसेच्या नादात फजिती सुद्धा होते हे अमृताचा हा किस्सा ऐकल्यानंतर जाणवतं. अमृता सोशल मीडियावर (Amruta Dhongade Instagram) चांगलीच ऍक्टिव्ह असते. झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेने बरीच लोकप्रिय झाली होती. ती येत्या काळात कोणत्या नव्या प्रोजेक्टचा भाग असणार हे जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या