अमिताभ बच्चन
मुंबई, 21 एप्रिल: काही काळापासून सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे तो म्हणजे ट्विटरने गुरुवार, 20 एप्रिल रोजी जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, अभिनेते, खेळाडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लु टिक हटवली आहे. यामध्ये भारतातील अनेक नेत्यांसह बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शाहरुखखान , विराट कोहली, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्या नावापुढील ब्लु टीका हटवण्यात आली आहे. यानंतर आता अमिताभ यांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. बिग बीनी भोजपुरी भाषेत ट्विटरचीच फिरकी घेतली आहे. ट्विटरचे सगळे मालकी हक्क हे एलॉन मस्ककडे गेल्यापासून त्यांनी ट्विटरवर अनेक बदल केले आहेत. दरम्यान, अचानक अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि राजकारणींची ब्लू टिक काढलं आहे. त्यावर अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. अशात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तर पोस्ट शेअर करत या प्रकरणी त्यांनी पैसे देऊनही ब्लू टिक काढल्याचं सांगितलं आहे. अमिताभ यांनी अस्सल भोजपुरी भाषेत शेअर केलेली ही भन्नाट पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट मध्ये लिहिले की, ’ ‘ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा जोड़े पड़ी का ??’ अमिताभ यांनी केलेल्या या ट्वीटनं नेटकऱ्यांना हसू अनावर झाले आहे. अनेकांनी अमिताभ यांच्या या ट्वीटवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. Nagraj Manjule: नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; ‘या’ ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचं आयुष्य झळकणार मोठ्या पडद्यावर एका नेटकाऱ्याने चिड़िया उड़ी फुर्र असं म्हटलंय, तर दुसरा नेटकरी म्हणाला, सर 3-4 दिवसात येईल. अनेक जण बिग बींना, ‘आम्हाला माहितीये की तुम्ही तुम्हीच आहात.’ असं म्हणत त्यांना दिलासा दिला आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, सर आता तुम्हाला निळ्या रंगाची टीक मिळणार नाही. दुसरा नेटकरी म्हणाला, सब्र का फल Blue Tick होता है. तिसरा नेटकरी म्हणाला, आपके पास क्या है हमारे पास ब्लू टिक है. आणखी एक नेटकरी म्हणाला, बच्चन जी काय करायचं, एलॉन मस्कचं काय करायचं बोला. ’ अशा भन्नाट कमेंट्स अमिताभ यांच्या पोस्टवर आल्या आहेत.
एलॉन मस्कनं 20 एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं जाहीर केलं होतं. पैसे मोजून आता ब्लू टिक घेता येणार आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीच या सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. आता वेबसाईटवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी 8 डॉलर प्रतिमहिना तर मोबाईल अॅपवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी 11 डॉलर प्रतिमहिना असे दर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.