केबीसी
मुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. येत्या 11 ऑक्टोबरला बिग बी आपला 80 वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेत. बिग बींचा वाढदिवस आणि तो 80 वा म्हणजे या दिवसाचं जग्गी सेलिब्रेशन होणार आहे. केबीसी आणि बिग बी यांचंही खास नात आहे. गेले 13 सीझन बिग बी मोठ्या उत्साहानं केबीसीचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. बिग बींच्या 80व्या वाढदिवसासाठी केबीसीच्या मंचावर देखील स्पेशल सरप्राइज प्लान करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी केबीसीच्या मंचावर पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. पण लेकाला मंचावर पाहताच बिग बी चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळणार आहे. यानिमित्तानं अभिषेकही पहिल्यांदाच केबीसीच्या मंचावर दिसणार आहे. केबीसीचा बिग बी बर्थ डे स्पेशल एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात बाप लेक एकमेकांना पाहाताच घट्ट मिठी मारून भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. बिग बींच्या डोळ्यातही अश्रू तरळलेले पाहायला मिळतायत. हेही वाचा - KBC 14 : स्पर्धकाची पत्नी म्हणाली अमिताभ बच्चनचे चित्रपट ‘फालतू’; ऐकून बिग बींनी मारला कपाळावर हात
बिग बी अमिताभ बच्चन यांचा बर्थ डे स्पेशल एपिसोड 11 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार आहे. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, बिग बी केबीसी 14 होस्ट करत असताता आणि मध्येच शो बंद होण्याचा अलाम वाजतो. फार लवकर शो बंद झाल्याचं पाहून बिग बी हैराण होतात. तितक्यात मागून अभिषेक बच्चन ‘कभी कभी मेरे दिल मे खयाल आया’, म्हणत एंट्री घेतो. अभिषेकला केबीसीच्या मंचावर पाहून बिग बी भावुक होऊन त्याला मिठी मारतात. आता अभिषेक बिग बींना नक्की काय बोल्ला ज्यानं बिग बींच्या डोळ्यात पाणी आलं हे 11 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये कळणार आहे.
बिग बींच्या प्रसिद्ध ‘सिलसिला’ सिनेमातील ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता हैं’, असं म्हणत आलेला अभिषेक पुढे नेमकं काय म्हणाला? अभिषेक आणि जया बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर काय धम्माल केली? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.