मुंबई, 07 मार्च : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या अफेअरच्या चर्चा मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सुरू आहेत. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं असलं तरीही त्यांच्यातली जवळीक कोणापासून लपून राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी विकी कौशल कतरिनाला गुपचूप भेटायला जात असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता या दोघांनी होळी एकत्र साजरी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ईशा अंबानीच्या होळी पार्टीतील आहे. होळी निमित्त ईशा अंबानीनं नुकतीच तिच्या मुंबईतल्या घरी शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यात जवळपास सर्वच बॉलिवूड कलाकारांना बोलवण्यात आलं होतं. ज्याचे काही इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात विकी कतरिना कैफला रंग लावताना दिसत आहे. तर आणखी एका व्हिडीओमध्ये हे दोघंही एकत्र डान्स करताना दिसत आहेत. दोघांच्या अफेअरच्या चर्चांमध्ये त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हेमा मालिनींनी सांगितली लेकीची अनटोल्ड स्टोरी, सतर्कतेमुळे वाचली इशा देओल
ईशा अंबानीच्या या पार्टीमध्ये कतरिना आणि विकी व्यतिरिक्त प्रियांका-निक जोनस, जॅकलिन फर्नांडिस, राजकुमार राव, सोनाली बेंद्रे, डायना पेंटी यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. निक जोनसनं या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यातील एका फोटोमध्ये निक आणि प्रियांकासोबत कतरिना कैफ सुद्धा दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना निकनं लिहिलं, ‘माझी पहिली होळी. माझ्या इंडियातल्या दुसऱ्या घरी. हा खूपच छान अनुभव होता.’ विवाहित असूनही अनुपम खेर पुन्हा पडले होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात!
विकी आणि कतरिना बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विकी कौशल म्हणाला होता की त्याला आता त्याची पर्सनल लाइफ गार्ड करायची आहे. कारण जर तो स्वतः याबद्दल काहीही बोलला तर अफवा आणि गैरसमज पसरतील. हेच नेमकं विकीला नको आहे. विकी म्हणाला, ‘यातच भलं आहे की मी माझ्या पर्सनल लाइफ बद्दल थोडा सतर्क राहावं. त्यामुळे मी आता माझ्या लाइफबद्दल कोणतीच गोष्ट उघडपणे सांगणार नाही.’ आता फ्रीमध्ये पाहू शकता ‘तान्हाजी’, कसं? इथे वाचा
विकीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘भूत’ सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं चांगली कमाई केली आहे. याशिवाय तो करण जोहरच्या ‘तख्त’मध्येही दिसणार आहे. तर कतरिनाचा अक्षय कुमार सोबतचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Birthday Special : अनुपम खेर करणार होते अर्चना पुरणसिंहला KISS, पण…