JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : आलिया भट्टला विचारलं 'R' तुझ्यासाठी लकी आहे का? लाजून अभिनेत्रीने दिलं असं उत्तर...

Video : आलिया भट्टला विचारलं 'R' तुझ्यासाठी लकी आहे का? लाजून अभिनेत्रीने दिलं असं उत्तर...

बॉलिवूडमध्ये ठसा उमटवल्यानंतर आलिया (Alia Bhatt) आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तिचा ‘RRR’ हा नवा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 डिसेंबर - आलिया भट्टने (Alia Bhatt)  आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये ठसा उमटवल्यानंतर आलिया आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तिचा ‘RRR’ हा नवा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. दरम्यान, ‘RRR’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आलिया विचारला आरशी संबंधीत प्रश्न आलिया भट्टचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ ‘RRR’च्या ट्रेलर लॉंच आहे. या व्हिडिओमध्ये आलिया दिग्दर्शक एसएस राजामौली, अजय देवगण, जूनियर एनटीआर यांच्यासोबत बसली आहे. ट्रेलर लाँचदरम्यान आलिया भट्टने मीडियाशी संवाद साधला. अशा स्थितीत एका व्यक्तीने तिला विचारले- ‘आर तुझ्यासाठी लकी आहे का?’ तुझ्या आयुष्यात देखील एक आर आहे. वाचा :  ज्युनियर एनटीआर - राम चरणच्या ‘RRR’ चा शहारे आणणारा Trailer लाजून झाली लाला यावर आलिया भट्ट काहीशी लाजली. ती राजामौली, अजय आणि एनटीआर यांच्याकडे पाहून हसताना दिसली. या प्रश्नाला उत्तर देताना आलिया काही वेळा थांबली व म्हणाली, ‘मी काय बोलू हेच समजत नाहीये. मला काही समंजस उत्तर द्यावे लागेल. होय, आर माझ्यासाठी भाग्यवान आहे आणि ए देखील.’ हे ऐकून उपस्थित असलेले लोक खूश झाले आणि मोठमोठ्याने आवाज करू लागले. वाचा :  विकी -कतरिनाच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल! आर म्हणजे रणबीर कपूर आर म्हणजे रणबीर कपूर. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. आलिया भट्टने फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर रणबीर कपूरवर प्रेम व्यक्त केले. दोघेही ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

संबंधित बातम्या

‘आरआरआर’ चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत आहेत.आरआरआरचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘बाहुबली’ (Bahubali) सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्याचा दुसरा भाग देखील दिला आहे.त्याची कथा लेखक व्ही. विजयेंद प्रसाद यांनी लिहिली असून संगीत तामिळ संगीत दिग्दर्शक एमएम करीम यांनी दिले आहे. हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या