रेखा-आलिया भट्ट
मुंबई, 21 फेब्रुवारी- दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार सोहळा 2023 नुकतंच पार पडला. फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील आलिया भट्ट आणि रेखा यांचा सुंदर व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या दोन्ही उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार सोहळ्यात एकत्र प्रवेश करताना दिसून आल्या. यावेळी आलियाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करुन ‘गंगूबाई काठियावाडी’ची आठवण करुन दिली. तर दुसरीकडे रेखा त्यांच्या ट्रेडमार्क असणाऱ्या सिल्क साडीत दिसून आल्या. आता या व्हिडीओववरुन सोशल मीडियावर प्रचंड कमेंट्स पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर पापाराझींनी रेखा आणि आलिया भट्टचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये त्या दोघी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सोहळ्यात सहभागी झालेल्या दिसून येत आहेत. या सोहळ्यात आलिया भट्टला रेखा यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. ‘गंगुबाई काठडियावाडी’ या चित्रपटासाठी आलियाला हा पुरस्कार मिळाला आहे. तर अभिनेत्री रेखा यांनासुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कारने गौरविण्यात आलं आहे. (हे वाचा: Sonu Sood: कोरोना काळात मदतीसाठी पैसा कुठून आला? सोनू सूदने दिलं उत्तर ) या व्हायरल व्हिडीओमध्ये आलिया पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आलेली दिसून येत आहे. स्टेजवर येताच आलिया रेखा यांचा आशीर्वाद घेते. दरम्यान दोघींमध्ये संवादही होतो. पुरस्कार दिल्यानंतर रेखा आलियाला मिठी मारतात. या दोघींचे हे खास कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
आलिया भट्टसोबतच पती आणि अभिनेता रणबीर कपूरलासुद्धा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रणबीरला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. परंतु यावेळी रणबीरला उपस्थित राहता आलं नाही. अभिनेता आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशन आणि शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे आपल्या पतीच्यावतीने आलिया भट्टने हा पुरस्कार स्वीकारला आहे.
दरम्यान रेखा आणि आलिया भट्टच्या व्हायरल व्हडिओवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये काहींनी कमेंट्स करत रेखा यांना नॅचरल ब्युटी म्हटलं आहे.. तर काहींनी आलियाला व्हाईट साडीत अतिशय सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी आलियासमोर रेखाच अधिक सुंदर दिसत असल्याचं म्हटलं आहे.रेखा यांचं सौंदर्य आजही तितकंच आहे असं म्हणत चाहत्यांनी रेखा यांना दाद दिली आहे.