साऊथ-बॉलिवूड अभिनेता जनमाणसांत प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अनेकांनी अभिनेत्याची देवदूताशी तुलना केली आहे.
दरम्यान अनेकांना असा प्रश्न पडतो की, कोरोना काळात मदत करण्यासाठी अभिनेत्याकडे इतका पैसा कुठून आला?
आता अभिनेत्याने स्वतः या प्रश्नाचं उत्तर देत, सत्य सांगितलं आहे. 'आप की अदालत'मध्ये अभिनयाने याचं स्पष्ट उत्तर दिलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू सूदने सांगितलं की, 'ज्यावेळी मी मदत करायला सुरुवात केली. तेव्हा मला लक्षात आलं, की मी दोन दिवससुद्धा सर्वांना मदत करु शकणार नाही'.
त्यामुळे मी माझ्या सर्व ब्रँड्सना निधी गोळा करायला सांगितला. त्यातून येणार पैसा मी लोकांच्या मदतीसाठी वापरला.
इतकंच नव्हे तर अभिनेत्याने सांगितलं की, मी औषध असो किंवा इतर कोणताही ब्रँड सर्वांनाच यासाठी तयार केलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यामध्ये निधी गुंतवा मी तुमच्या जाहिराती करण्यासाठी एक पैसाही घेणार नाही. अशाप्रकारे अभिनेत्याने कोरोना काळात मार्ग काढत लोकांना मदतीचा हात दिला आहे.