बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरने आपल्या लेकीचं नाव फारच हटके ठेवलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं आहे. आलिया आणि रणबीरनेसुद्धा अनुष्का आणि विराटप्रमाणे 'नो फोटो पॉलिसी' फॉलो केली आहे. त्यामुळे चाहते राहाचा चेहरा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न नेहमीच विचारत असतात. दरम्यान आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहताच लोक ही राहा आहे का? असा प्रश्न विचारत आहेत. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो अभिनेत्रीने लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करत जाहिरातीतील मुलीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे राहाचा चेहरा पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.