अक्षय कुमार
मुंबई, 02 नोव्हेंबर : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मागची अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. अक्षय त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच मात्र अक्षयचा फिटनेसही कायम चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये फार कमी अभिनेत्यांनी आपल्या वर्कआऊटवर फोकस करत शारिरीकदृष्ट्या स्वत:ला तंदरूस्त ठेवलं. वयाच्या पन्नाशीनंतरही अभिनेत्यांचा फिटनेस वाखाडण्याजोगा आहे. अभिनेता अक्षय कुमार आजही इतका फिट आणि फ्रेश कसा असा प्रश्न सर्वांना पडला असेल. नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात वयाच्या 55व्या वर्षीही अक्षय कुमारचा फिटनेस पाहायला मिळतोय. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अक्षय काय करतोय ते पाहायला मिळालं आहे. अक्षयनं इन्स्टाग्रामवर त्याचा जीममधला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो दणकूण व्यायाम करताना दिसतोय. व्यायामा दरम्यान एका रॉडवरून लटकत दुसऱ्या रॉवर जाण्याचा व्यायाम अक्षय करताना दिसतोय. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला चांदनी चॉक टू चायना या सिनेमातील चक लेन दे हे गाणं वाजत आहे. माझ्या दिवसाची सुरूवात तेव्हा सुरू होते जेव्हा माझी सकाळ काहीशी अशाप्रकारे सुरू होते. आणि तुमची? असं कॅप्शन देत अक्षयनं व्हिडीओ शेअर केला आहे. हेही वाचा - किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं सरप्राईज, ‘पठाण’चा धमाकेदार टीझर रिलीज अक्षयनं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फिटनेस फ्रिकचा स्टॅमिना पाहून सगळेच अवाक झालेत. चाहत्यांनी अक्षयचं कौतुक करत व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘अपना हिरो अभी भी तगडा है’, असं एका चाहत्यानं म्हटलं आहे. तसंच ‘नाइस सर’, ‘वाह सर’, ‘ग्रेट पाजी’ असं तोंडभरून अक्षयचं कौतुक होताना दिसत आहे.
अक्षय कुमार त्याच्या फिटनेसबाबत फार अलर्ट असतो. ओपन वर्कआऊटवर अक्षयचा सर्वाधिक विश्वास आहे. अक्षय दररोज वेळेत झोपतो आणि वेळेत उठतो. सकाळी लवकर उठल्यानं शरिराला ऊर्जा मिळते आणि शरीर फिट राहतं असं अक्षयचं म्हणणं आहे. सिनेसृष्टीत आल्यापासूनच अक्षयनं अनेक अॅक्शन सिनेमात काम केलं आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच त्याचा फिटनेस त्यानं मेंटेन ठेवला आहे.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर अक्षय कुमारचा राम सेतू हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यानंतर आता अक्षयचा बडे मिया छोटे मिया, गोरखा, कॅप्सून गिल, सेल्फी आणि सोरराई पोटरू हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.