JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'TDM ला स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी'; अजित पवारांनीही केलं आवाहन

'TDM ला स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी'; अजित पवारांनीही केलं आवाहन

मराठी सिनेमांच्या स्क्रिन्सचा ऐरणीवर असताना या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धावून आल्याचं पाहायला मिळतंय.

जाहिरात

ajit pawar on tdm movie

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 मे : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांचा TDM हा सिनेमा 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र सिनेमाला हव्या तशा स्क्रिन्स न मिळाल्याने दिग्दर्शकांसह कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  सिनेमाच्या कलाकारांनी थेट थिएटरमध्ये जाऊन कलाकारांसमोर हात जोडून सिनेमा पाहण्याची विनंती केली. मेहनतीनं तयार केलेल्या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रिन्स न मिळाल्याने कलाकारांना अक्षरश: रडू कोसळलं. मराठी सिनेमांच्या स्क्रिन्सचा ऐरणीवर असताना या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार धावून आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांनी ट्विट करत TDM सिनेमाला स्क्रिन उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केलं आहे. TDM सिनेमाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे आणि कलाकारांचा थिएटरमधील भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मराठी सिनेमांच्या स्क्रिनिंगचा प्रश्न यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अजित पवार यांनी ट्विट करत याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेही वाचा - ‘मराठी सिनेमा संपवला जातोय’, TDMला स्क्रीन मिळेना; दिगदर्शक, कलाकारांनी जोडले हात

संबंधित बातम्या

अजित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी”. अजित पवार यांनी केलेल्या या ट्विटची दखल संबंधित थिएटर मालक घेणार का? आणि TDM सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्र हव्या तितक्या स्क्रिन उपलब्ध होणार का ? याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. “मराठी सिनेमा संपतोय, संपवला जातोय. मराठी सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही. माझी विनंती आहे की तुम्ही पाठिंबा दिला तर सर्व शक्य आहे. इतक्या कष्टानं सिनेमा तयार केलाय. पण जेव्हा थिएटरमध्ये यायला पाहिजे तेव्हा येऊ देत नाही. आजच्या काळात मला ही फार गंभीर गोष्ट वाटतेय”, अशी खंत सिनेमाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांशी बोलताना कलाकार आणि दिग्दर्शक यांना अश्रू अनावर झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या