JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चा, अजय देवगणनं ट्विटरवरून सांगितलं सत्य

काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चा, अजय देवगणनं ट्विटरवरून सांगितलं सत्य

काजोल आणि न्यासा सिंगापूरहून भारतात परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लगाण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च : सध्या देशभरात कोरोनाग्रस्तांची झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत 32 लोकांचा हा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यादरम्यान अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा देवगण यांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू होत्या. अजय देवगणलाही सतत काजोल आणि न्यासाच्या तब्येतीची चौकशी करणारे मेसेज सतत येत होते. पण आता स्वतः अजयनंच ट्विटरवरून याबाबतचं सत्य सांगत या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. अजय देवगणनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट करत काजोल आणि न्यासाला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला. अजयनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, सर्वांनी विचारल्याबद्दल धन्यावाद. पण काजोल आणि न्यासा ठणठणीत आहेत. त्यांना कोरोना झालेला नाही. त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा केवळ अफवा आहेत. अजय देवगणनं या ट्वीटमधून काजोल आणि न्यासाला कोरोना झाल्याच्या चर्चांचं खंडण करत त्यांच्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. Lockdown : दूरदर्शनवर सुरू झाले जुने शो, सनी लिओनीनं केलं हटके स्वागत

काही दिवसांपूर्वी न्यासाला कोरोना व्हायरसची काही लक्षण दिसल्यानं काजोल तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपूर्वीच काजोलनं न्यासाला सिंगापूरवरून भारतात आणल्यानं या अशा अफवांना खतपाणी मिळलं होतं. काजोल आणि न्यासाचे त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. मात्र बाबतचं सत्य आता बाहेर आलं आहे. अमृता-RJ अनमोलचा खास लॉकडाऊन VIDEO, लाईव्हदरम्यान केलं चाहत्याच्या मुलीचं बारसं

संबंधित बातम्या

बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटींप्रमाणेच अजय देवगणचं कुटुंबही सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. काजोल आणि अजय सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. सध्या हे दोघंही त्यांच्या सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अजयनं त्याच्या चाहत्यांना घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. लढा कोरोनाशी! अभिनेत्री सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या