Lockdown : दूरदर्शनवर सुरू झाले जुने शो, सनी लिओनीनं केलं हटके स्वागत
लॉकडाउनमुळे दूरदर्शनवर 'रामायण' आणि 'शक्तीमान' सारखे लोकप्रिय शो पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्यावर सनीनं सुद्धा एकदम हटके पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं आहे.
|
1/ 7
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या लुक आणि फोटोंमुळे चर्चेत असते. कॅनडामध्ये जन्मलेल्या सनीचे भारतात लाखो चाहते आहेत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
2/ 7
सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दूरदर्शनवर रामायण आणि शक्तीमान सारखे लोकप्रिय शो पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आणि सनीनं सुद्धा एकदम हटके पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं आहे.
3/ 7
सनीनं नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात तिच्या टी-शर्टवर ’90 चा काळ पुन्हा परत आलाय’ असं लिहिलं आहे.
4/ 7
सनीनं हे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘त्यांनी माझ्या टी-शर्टला खूपच गांभीर्यानं घेतलं आहे. सांगा पाहू डीडी नॅशनल वर कोण परत येत आहे?’
5/ 7
कोरोना व्हायरसनं देशभरात घातलेल्या थैमानमुळे सध्या सगळीकडे लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे इतर शोचं शूटिंग बंद पडल्यानं दूरदर्शनवर पुन्हा जुने शो प्रसारित केले जात आहेत.
6/ 7
‘रामायण’नंतर आता सुपरहीट मालिका शक्तीमान सुद्धा पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. ही मालिका एप्रिल 2020 पासून दुपारी 1 वाजता प्रसारित होणार आहे.
7/ 7
‘शक्तीमान’ 90 च्या दशकातील सुपरहिट मालिका होती. लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अद्याप आपलं स्थान कायम ठेवलं आहे.