JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Gangubai Kathiawadi trailer आधी अजय देवगणचा लूक रिलीज, पण भूमिका गुलदस्त्यात

Gangubai Kathiawadi trailer आधी अजय देवगणचा लूक रिलीज, पण भूमिका गुलदस्त्यात

Gangubai Kathiawadi trailer: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्याचा ट्रेलर 4 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्टशिवाय अजय देवगण(ajay devgn) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात

Gangubai Kathiawadi Ajay Devgn

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ नवा पोस्टर नुकताच आलियाने शेअर केला आणी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे याची माहिती दिली. आणि विशेष म्हणजे चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचे पोस्टर पहिल्यांदाच रिलीज करण्यात आले आहे. आलियानं गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. आ रहे है कल, ट्रेलर के साथ अशी कॅप्शन देत ट्रेलर प्रदर्शनासाठी केवळ एक दिवस असल्याचे तिने सांगितले आहे. या नव्या पोस्टमध्ये अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) दिसत आहे. गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्टशिवाय अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, अजय देवगणच्या लूकबाबत अद्याप निर्मात्यांनी खुलासा केलेला नाही.

तसेच कालही आलियाने नवे पोस्टर शेअर करत ट्रेलरची तारिख जाहिर केली होती. ‘या पोस्टमध्ये आलिया नाकात नथ, लाल रंगाची बिंदी आणि पांढऱ्या रंगाची साडी अशा लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरमधील आलियाच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट 18 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याची रिलीज डेट पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. अखेर 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या